Crime News Pudhari
पुणे

Pune Crime: मांजरी खुर्द येथे मित्राचा खून करून फरार आरोपी वाघोली पोलिसांकडून अटक

फार्महाऊसमध्ये वादातून पाईपने मारहाण; उपचारादरम्यान मजुराचा मृत्यू, साताऱ्यातून आरोपी ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मित्राचा खून करून पसार झालेल्या एकाला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. मांजरी खुर्द भागातील एका फार्महाऊस परिसरात ही घटना नुकतीच घडली होती.

सूरज अमृत साव (वय ३५, रा. भालुका, जि. नाडिया, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिवशंकर सिंह असे खून झालेल्याचे नाव आहे. सूरज आणि शिवशंकर हे बांधकाम मजूर आहेत.

मांजरी-कोलवडी रस्त्यावरील एका फार्महाऊसमधील खोलीत १ जुलैला सूरज आणि शिवशंकर यांच्यात वाद झाला. वादातून सूरजने शिवशंकरला पाईपने मारहाण केली. गंभीर जखमी शिवशंकरचा. उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मित्राचा खून करून सूरज पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सूरज हा सातारा परिसरात असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रदीप मोटे, सुनील कुसाळकर, दीपक कोकरे यांना मिळाली. त्यानंतर सूरजला सातारामधील एका नियोजित गृहप्रकल्प परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

चैाकशीत त्याने मित्राचा खून केल्याची कबुली दिली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक निरीक्षक विनायक अहिरे, उपनिरीक्षक शहादेव हवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT