पुणे

पुणे : वारंवार अवैध दारू धंदा करणारा १ वर्षासाठी स्थानबध्द

निलेश पोतदार

ओतुर (ता. जुन्नर) पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही इसम अनेकदा कायदेशीर कारवाई होऊनही सातत्याने अवैध दारू विक्री करत असल्याने व कायदयास न जुमानता अवैध दारू धंदे सुरूच ठेवत आहेत. अशा अवैध व्यवसायांना वेळीच आळा घालुन त्यांचेवर प्रचलीत कायदयान्वये कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेले आहेत. त्यानुसार ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका इसमावर एम.पी.डी. ए. कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यास एक वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात येऊन त्याची थेट येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाययक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

ओतुर पोलीस स्टेशन हद्दीतील वारंवार अवैध दारू धंदा करून दहशत माजवणाऱ्या इसमांचा अभिलेख तपासुन असे गुन्हे नियमीत करणाऱ्या इसमांची यादी तयार करण्यात आली. यापैकी बाळु बबन नायकोडी (वय ३९, रा. डिंगोरे शिवशाही हॉटेल, ता. जुन्नर, जि. पुणे, मुळ रा. सांगणोरे) याचेवर वारंवार अवैध दारू विक्री करणे, गर्दी जमाव जमवुन मारहाण करणे, अतीप्रमाणात दारू पाजल्यामुळे मृत्यु होवु शकतो हे माहिती असताना सुध्दा एखादयास जाणीवपूर्वक दारू पाजुन त्याच्या मृत्युस कारणीभुत ठरणे, अशा प्रकारचे एकुण ६ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

वरील गुन्हयातील आरोपी बाळु बबन नायकोडी याच्या विरूध्द ओतुर पोलीस ठाणे येथुन एम.पी.डी.ए. कायदयांतर्गत प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव पोलीस अधीक्षक पुणे ग्रामिण यांचे मार्फत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी सदर प्रस्तावामधील बाळु बबन नायकोडी यास सदर कायदयांतर्गत १ वर्षे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार बाळु बबन नायकोडी यास पोलीस अधिकारी केरूरकर व पथकाने त्‍याला ताब्यात घेवून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधीक्षक मंदार जवळे, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT