Health Checkup Pudhari
पुणे

Pune Free Health Checkup Camp: पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर; ३५० महिलांनी घेतला लाभ

सारसबागेसमोरील हरजीवन हॉस्पिटलमध्ये विविध रक्त तपासण्या, मॅमोग्राफी आणि हाडांच्या घनतेची तपासणी; रक्तदान शिबिरात ५० हून अधिक जणांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात रक्तदाब, श्वसन दर, शरीराचे तापमान, नाडी, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि रक्तशर्करा तपासण्या करण्यात आल्या. जवळपास ३५० महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

सारसबागसमोरील हरजीवन हॉस्पिटल येथे हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग आणि हरजीवन हॉस्पिटलतर्फे आयोजित हे शिबिर मंगळवारपर्यंत (दि. २०) सुरू राहणार आहे.

शिबिराचे संयोजन डॉ. सागर रोकडे पाटील यांच्यासह मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त आणि उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांच्या मार्गदर्शनात केले आहे.

शिबिरात संपूर्ण सीबीसी, थायरॉईड कार्यक्षमता, लिपिड प्रोफाइल, कॅल्शियम, युरिक ॲसिड आणि जीवनसत्त्व बी-१२ या रक्त तपासण्यांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय महिलांसाठी मॅमोग्राफी, हाडांच्या घनतेची तपासणी देखील करण्यात आली. तसेच मंदिरातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ५० हून अधिक जणांनी रक्तदान केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT