पुणे: ढगाळ वातावरणामुळे फुलांसाठी पोषक हवामान तयार झाल्याने झेंडू, शेवंती, ॲस्टर आदी सुट्ट्या फुलांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी, या फुलांची बाजारातील आवकही वाढली आहे. मात्र, त्यातुलनेत मागणी कमी असल्याने फुलांच्या भावात दहा ते वीस घसरण झाली आहे. याखेरीज, लग्नसराई संपल्यानंतर शोभिवंत फुलांच्या मागणीसह दरातही घट झाल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे :
झेंडू : 20-40, गुलछडी : 80-120, ॲष्टर : जुडी 10-20, सुट्टा 50-100, कापरी : 30-50, शेवंती : 60-100, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 10-20, गुलछडी काडी : 30-60, डच गुलाब (20 नग) : 100-200.
जर्बेरा : 30-50, कार्नेशियन : 100-150, शेवंती काडी 150-250, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्चिड 500-600, ग्लॅडिओ (10 काड्या) : 60-80, जिप्सोफिला : 150-200, लीली बंडल : 8-10.