Fish  Pudhari
पुणे

Pune Fish Price: पुण्यात मासळीचे दर तेजीत; चिकन स्वस्त, अंड्यांचे दर वाढले

आवक कमी असल्याने मासळी महाग; बाजारात दरांमध्ये मोठे चढ-उतार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशाच्या पूर्व किनारपट्टीवर मासेमारीबंदी लागू झाल्याने होड्या किनाऱ्यावर परतल्या आहेत. सद्यःस्थितीत पश्चिम किनारपट्टीवरून बाजारात मासळी दाखल होत आहे. बाजारातील मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने मासळीचे तेजीतील दर टिकून आहेत.

चिकन आणि इंग्लिश अंडीचा मागणी आणि पुरवठा पूर्वपदावर आला आहे. परिणामी, चिकनच्या वाढलेल्या भावात किलोमागे वीस रुपयांनी घसरण झाली आहे. तर, इंग्लिश अंडीच्या घसरलेल्या भावात शेकड्यामागे तीस ते चाळीस रुपयांनी वाढ झाली आहे. गावरान अंडी आणि मटणाचे भाव स्थिर राहिले. रविवारी बाजारात (दि. 12) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 150 ते 200 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 600 किलो इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) :

पापलेट : कापरी : 2000, मोठे : 1700-1800, मध्यम : 1400-1500, लहान : 1100-1200, भिला : 900-1000, हलवा : 800-1000, सुरमई 900-1400, रावस : 700-1200, घोळ : 1000-1200, करली : 350-400, करंदी (सोललेली) : 450-450, भिंग : 450-500, पाला : 1200-1500, वाम : पिवळी 600-1000, काळी : 350-400, ओले बोंबील : 350-450. कोळंबी : लहान : 280-350, मोठी : 600-850, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 700-800, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-400, मांदेली : 120-160, राणीमासा : 250-350, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 700-1000. खाडीची मासळी - सौंदाळे : 250-350, खापी : 250-350, नगली : 400-500, तांबोशी : 600, पालू : 240-300, लेपा : 350-400, बांगडा : 200-350, शेवटे : 250-300, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 150-200, तारली : 200-250. नदीतील मासळी : रहू : 140-180, कतला : 180-250, मरळ : 350-450, शिवडा : 200-250, खवली : 250-300, आम्ळी : 150-180, खेकडे : 250-450, चिलापी : 80-180, वाम : 500-600. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, कलेजी 840. चिकन 240, लेगपीस 290, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 340. अंडी : गावरान (शेकडा) 1100 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 505, डझन 72, प्रतिनग 6.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT