Fish  Pudhari
पुणे

Pune Fish Market Prices: पुण्यात मासळी, मटण आणि अंडीचे भाव ठरले; थंडीचा फटका

गणेश पेठ मासळी बाजारात आवक कमी, तरीही दर टिकले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळी दाखल होत आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. स्थानिक बाजारपेठेत मासळीला उंच बोली लागत असल्याने शहरातील व्यापारी वर्गाकडून कमी प्रमाणात मासळी मागविण्यात येत आहे. महाशिव रात्रीमुळे मासळी मागणी कमी आहे. मात्र, आवकही कमी असल्याने मासळीचे तेजीतील दर कायम आहेत. मटण, चिकन आणि गावरान अंडीचे मागील आठवड्यातील दर टिकून आहेत. इंग्लिश अंडीच्या भावात शेकड्यामागे पंधरा रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

रविवारी (दि. 15) खोल समुद्रातील मासळी 8 ते 10 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 400 किलो आणि नदीच्या मासळीची 400 ते 500 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर): पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1700-1800, मध्यम : 1400-1600, लहान : 1100-1200, भिला : 900-1000, हलवा : 750-850, सुरमई 700-800, रावस : 850-1200, घोळ : 900-1000, करली : 300-400, करंदी : 400-450, भिंग : 400-500, पाला : 1200-1400, वाम : पिवळी 700-1200, काळी : 400-600, ओले बोंबील : 250-400.

कोळंबी: लहान : 250-350, मोठी : 400-600, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 700-800, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-400, मांदेली : 100-140, राणीमासा : 250-350, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 700-800.

खाडीची मासळी: सौंदाळे : 250-350, खापी : 250-300, नगली : 550-600, तांबोशी : 500-600, पालू : 300-350, लेपा : 300-400, बांगडा : 150-200, शेवटे : 250-300, पेडवी : 150-200, बेळुंजी : 120-160, तिसऱ्या : 250-300, खुबे : 120-160, तारली : 200-250.

नदीतील मासळी: रहू : 140-180, कतला : 180-250, मरळ : 350-500, शिवडा : 200-250, खवली : 200-250, आम्ळी : 120-180, खेकडे : 250-400, चिलापी : 60-140, वाम : 550-600.

मटण: बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 250, लेगपीस 320, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 350.

अंडी: गावरान (शेकडा) 1300 डझन 168, प्रतिनग 14. इंग्लिश (शेकडा) 575, डझन 78, प्रतिनग 6.50.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT