Fish  Pudhari
पुणे

Pune Fish Market Rates: पुणे मासळी बाजारात कमी आवक; दर तेजीत कायम

उन्हामुळे विक्री मंदावली, मागणी कायम; चिकन, मटण व अंडी दर स्थिर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेश पेठ येथील मासळी बाजारात पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून मासळीची कमी प्रमाणात आवक होत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे मासळीची खरेदी-विक्री मंदावली आहे. आवकच्या तुलनेत मागणी चांगली असल्याने गत आठवड्यातील तेजीतील दर टिकून आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम कोंबड्याच्या वाढीवर झाला आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत दर्जेदार पक्ष्यांची उपलब्धता कमी प्रमाणात होत आहे. मात्र, आवक जावक कायम असल्याने चिकनसह मटण आणि अंडीचे दर स्थिर आहेत.

रविवारी बाजारात (दि. 22) खोल समुद्रातील मासळी 12 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 150 ते 200 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) -

पापलेट : कापरी : 1600-1800, मोठे : 1800-2000, मध्यम : 1300-1400, लहान : 1200, भिला : 900-1000, हलवा : 700-800, सुरमई 1000-1200, रावस : 800-900, घोळ : 900-1000, करली : 350-400, करंदी : 450, भिंग : 350-400, पाला : 1200-1400, वाम : पिवळी 600-1200, काळी : 350-400, ओले बोंबील : 350-450. कोळंबी : लहान : 350-450, मोठी : 480-700, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 700-800, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-400, मांदेली : 100-140, राणीमासा : 200-280, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 650-700. खाडीची मासळी- सौंदाळे : 250-300, खापी : 300-350, नगली : 550-600, तांबोशी : 550-600, पालू : 250-300, लेपा : 350, बांगडा : 250-300, शेवटे : 250-300, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-320, खुबे : 150-200, तारली : 200-250. नदीतील मासळी : रहू : 140-200, कतला : 180-300, मरळ : 350-450, शिवडा : 250-300, खवली : 250-300, आम्ळी : 120-200, खेकडे : 250-400, चिलापी : 60-160, वाम : 500-550. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 280, लेगपीस 320, जिवंत कोंबडी 200, बोनलेस 360. अंडी : गावरान (शेकडा) 1120 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 475, डझन 66, प्रतिनग 5.50.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT