Fish  Pudhari
पुणे

Pune Fish Market Prices: पुण्यात मासळीची मागणी घटली; चिकन-अंड्यांचे दर घसरले

नवरात्र-एकादशीचा परिणाम; पुरवठा वाढल्याने बाजारात दरात घसरण, मटण स्थिर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: चैत्री नवरात्र, आषाढी एकादशी आणि मार्चअखेर असल्याने बाजारात मासळीच्या मागणीत घट झाली आहे. गणेश पेठ येथील मासळी बाजारातील व्यापारीही आवश्यकतेनुसार मासळी मागवीत असल्याने गत आठवड्यातील तेजीतील दर कायम आहेत. देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात एप्रिलपासून मासेमारीबंदी लागू होत आहे. त्यामुळे होड्याही किनाऱ्यावर परतू लागल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन महिने पश्चिम किनारपट्टीवरील मासळीवर पुणेकरांची मदार राहणार आहे.

उन्हाचा वाढलेला चटका, त्यात व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळीत असल्याने हॉटेल-खानावळीतून चिकनला मागणी घटली आहे. त्यातुलनेत पुरवठा जास्त असल्याने चिकनच्या भावात किलोमागे वीस रुपयांनी घसरण झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंग्लिश अंडीच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने बाजारात मुबलक इंग्लिश अंडी उपलब्ध आहेत.

त्यातुलनेत मागणी कमी असल्याने भावात शेकड्यामागे चाळीस रुपयांची घसरण झाली आहे. तर, मटण आणि गावरान अंडीचे भाव स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले. रविवारी बाजारात (दि. 29) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 250 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1600-1800, मध्यम : 1300-1500, लहान : 1100-1200, भिला : 800-900, हलवा : 800-900, सुरमई 900-1200, रावस : 900-1000, घोळ : 900-1000, करली : 350-400, करंदी : 450-500, भिंग : 350-400, पाला : 1200-1400, वाम : पिवळी 300-500600-1000, काळी : 300-400, ओले बोंबील : 400-500. कोळंबी : लहान : 250-300, मोठी : 400-600, जम्बो प्रॉन्स : 1400-1500, किंग प्रॉन्स : 750-850, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-450, मांदेली : 120-160, राणीमासा : 250-300, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 700-800.

खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 250-300, नगली : 550-600, तांबोशी : 500-600, पालू : 250-300, लेपा : 350-400, बांगडा : 200-300, शेवटे : 300-350, पेडवी : 150, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 150-200, तारली : 200-250. नदीतील मासळी : रहू : 140-180, कतला : 180-220, मरळ : 350-450, शिवडा : 250, खवली : 200-250, आम्ळी : 150-180, खेकडे : 250-400, चिलापी : 80-180, वाम : 500-550. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 260, लेगपीस 320, जिवंत कोंबडी 200, बोनलेस 360. अंडी : गावरान (शेकडा) 1120 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 435, डझन 60, प्रतिनग 5.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT