Swine Flu H1N1 Pudhari
पुणे

Pune Swine Flu Cases: पुण्यात तापाचा कहर! सात महिन्यांत २१ हजार ५१२ रुग्ण; स्वाईन फ्लूचेही २७० बळी

डेंग्यूचे ९८२ रुग्ण; ऑगस्टमध्ये स्वाईन फ्लूचे २०५ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांत ‘फिव्हर ऑफ अननोन ओरिजिन’ अर्थात नेमके कारण स्पष्ट न झालेल्या तापाचे तब्बल २१ हजार ५१२ रुग्ण आढळले आहेत, तर सात महिन्‍यांत स्वाईन फ्लूचे २७० रुग्ण आढळले आहेत. केवळ ऑगस्‍ट महिन्यात २०५ रुग्‍ण स्वाईन फ्‍लूचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात पावसाळ्यामुळे डासोत्‍पत्ती होऊन डेंग्यूचे ९८२ आणि चिकनगुणियाचे १४ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आता तापाचे आणि स्वाईन फ्लूच्‍या रुग्णांची भर पडली आहे. पुणे महापालिकेच्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटच्या अहवालानुसार, जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांत ‘फिव्हर ऑफ अननोन ओरिजिन’ अर्थात नेमके कारण स्पष्ट न झालेल्या तापाचे २१ हजार ५१२ रुग्ण आढळले आहेत.

अशी घ्या काळजी

  • स्वाईन फ्लूची लक्षणे असल्यास वेळेवर उपचार घ्या.

  • आवश्यकतेनुसार तपासणी व वैद्यकीय सल्ला घ्या.

  • आजारी व्यक्तीने गर्दीपासून दूर राहणे.

  • संसर्ग इतरांपर्यंत पोचणार नाही याची नागरिकांनी काळजी घेणे.

  • खोकताना, शिंकताना नाका-तोंडाला रूमाल लावणे.

  • आजारी असलेल्‍या मुलांना शाळेत पाठवू नये.

मागील वर्षीपेक्षा यंदा तपासणी अधिक केली जात आहे. तसेच सध्याचे वातावरण हे देखील स्वाईन फ्लूच्‍या वाढीचे कारण ठरत आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. ताप आल्‍यास अंगावर न काढता त्‍वरीत वैद्यकीय सल्‍ला घ्यावा.
डाॅ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
देशात स्वाईन फ्‍लूचा जुनाच प्रकार आहे. त्‍यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. लहान मुले, वृद्ध व्यक्‍ती आणि आधीपासूनच काही आजार असलेल्या व्यक्‍तींना याचा धोका असू शकतो. जर लक्षणे तीव्र वाटली, तर डॉक्‍टरांचा वेळेवर सल्‍ला घेणे आवश्यक आहे.
डॉ. राजेश कार्यकर्ते, विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्‍त्र विभाग, बीजे वैद्यकीय महाविद्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT