Pune Road Inspection: पुण्यात आता अधिकारी दुचाकीवरून फिरून तपासणार रस्ते; खड्डे-अतिक्रमणांवर तातडीने कारवाईचे आदेश

चारचाकीतून पाहणीला फाटा; कनिष्ठ अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंत अधिकाऱ्यांना नियमित रोड राईडिंगचे निर्देश
Road Inspection
Road InspectionPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील रस्त्यांवर खड्डे, रस्त्यांची झीज, पदपथांवरील अतिक्रमणे, चौकांची दुरवस्था तसेच जल-मलवाहिन्यांची उघडी अथवा खराब झाकणे यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांची प्रत्यक्ष स्थिती कार्यालयात बसून किंवा चारचाकीतून पाहणी करून लक्षात येत नसल्याने पथ विभागातील अधिकाऱ्यांनी आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करावी, यासाठी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसाठी परिपत्रक काढले आहे.

Road Inspection
Manmad Belgaon Highway: मनमाड-बेळगाव महामार्गाच्या समस्या कायम; सात वर्षांनंतरही शेतकरी-नागरिकांची फरफट

कनिष्ठ अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी नियमितपणे दुचाकीवरून रस्त्यांची पाहणी करून खड्डे, रस्त्यांची झीज, अतिक्रमणे आणि अन्य पथविषयक समस्या तातडीने निदर्शनास आणाव्यात, असे आदेश त्यात देण्यात आले आहेत. पुण्यातील रस्त्यांची अवस्था खराब आहे. रस्त्यांच्या बाबतीत नागरिक लोकप्रतिनिधी वारंवार तक्रारी करत असतात. असे असताना रस्त्यांची दुरुस्ती योग्य होत नसते. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांना त्यांच्या समस्या तत्काळ समजाव्यात आणि तक्रारी कमी व्हाव्यात, यासाठी पावसकर यांनी हे आदेश काढले आहेत.

Road Inspection
Pune School Sports Competitions: शालेय क्रीडा स्पर्धा अजूनही ‘वेटिंग’वर; दोन महिने उलटले, खेळाडूंचा सराव रखडला

पावसककर यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार पथ विभागातील परिमंडळ झोन क्रमांक २ ते ५ आणि त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांमधील रस्ते विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन रस्ते बांधणी, रस्ते देखभाल-दुरुस्ती, डांबरीकरण आदी कामांची त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करावी. या पाहणीदरम्यान रस्ते, पदपथ, चौक, जल व मलवाहिन्यांच्या झाकणांची स्थिती, पदपथांवरील खड्डे, रस्त्यांची झीज, अतिक्रमणे तसेच अन्य पथविषयक समस्यांकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Road Inspection
Pune DJ Free Ganeshotsav: पुण्यात २०० हून अधिक गणेश मंडळांचा डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार

चारचाकी वाहनातून पाहणी करताना अनेक बाबी निदर्शनास येत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर फिरून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुचाकीचा वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. पाहणीदरम्यान आढळलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्याबरोबरच त्याचा अहवाल विभागप्रमुखांकडे सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. रस्त्यांवरील खड्डे आणि अन्य दोषांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे. रस्त्यांची 'रोड रायडिंग क्वालिटी' आणि सुरक्षितता याकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

Road Inspection
Narayangaon Eid E Milad: नारायणगावात डीजेमुक्त ईद-ए-मिलाद जुलूस; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

काय तपासणार?

रस्त्यांवरील खड्डे आणि झीज रस्ते व पदपथांची सुरक्षितता नवीन रस्ते व दुरुस्तीच्या कामांची गुणवत्ता चौकांची स्थिती जल व मलवाहिन्यांची झाकणे रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे अन्य पथविषयक समस्या

'कागदावरील पाहणी'ला लगाम

रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याऐवजी केवळ कार्यालयीन पातळीवरून आढावा घेण्याच्या पद्धतीला या आदेशामुळे आळा बसण्याची शक्यता आहे. दुचाकीवरून प्रत्यक्ष रस्त्यांवर फिरून पाहणी केल्यास खड्डे, रस्त्यांची झीज, अतिक्रमणे आणि पदपथांवरील अडथळे तातडीने निदर्शनास येतील, असा प्रशासनाचा उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news