Pune FDA Action Pudhari
पुणे

Pune FDA Action: तीन हॉटेलां­वर एफडीएची कारवाई; अंगणवाड्यांना पुरवठा करणाऱ्या साठ्यामध्ये दोष

अस्वच्छता पसरविणाऱ्या हॉटेलचे परवाने रद्द; १९ लाखांचा भेसळयुक्त साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत धडक कारवाई करत खळबळ उडवून दिली आहे. अस्वच्छता, प्रतिबंधित पदार्थांचा वापर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३ मोठ्या हॉटेल्स व रेस्टॉरंट्सचे परवाने प्रशासनाने तत्काळ निलंबित केले आहेत. यात ‘केएफसी’च्या बावधन येथील विनापरवाना स्टोरेज युनिटचाही समावेश आहे.

गेल्या चार दिवसांत प्रशासनाने पुणे विभागातील ५ ठिकाणी छापे टाकून भेसळीच्या संशयावरून सुमारे २० लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त केला आहे. यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यांतील नामवंत मिठाई दुकाने व अन्न पुरवठा करणाऱ्या संस्थांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, अंगणवाड्यांना पुरवठा होणाऱ्या ९.५७ लाख रुपयांच्या साठ्यामध्येही दोष आढळून आल्याने तो जप्त केला आहे. या कारवाई केलेल्या हॉटेल्‍समध्ये मारुंजी येथील बाबाज किचन, हिंजेवाडी येथील अम्ब्रोसिओस यांचाही समावेश आहे.

पुणे विभागात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित

तंबाखू विक्री करणाऱ्या ९ आस्थापनांवर एफआयआर दाखल करत १२ जणांना अटक केली आहे. या कारवाईत १८ लाखांचा प्रतिबंधित साठा आणि ७ लाखांची वाहने जप्त केली आहेत. स्वच्छतेच्या नियमांशी तडजोड करणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा सहआयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT