Electricity  Pudhari
पुणे

Pune Electricity Rate Cut: पुणेकरांना वीजदरात दिलासा; सरासरी 30 पैशांनी दर कमी

उन्हाळ्यात महावितरणचा मोठा निर्णय; लाखो ग्राहकांना महिन्याला कोट्यवधींची बचत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वीजदर सरासरी तीस पैशांनी कमी झाल्याने पुणे परिमंडळातील ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात सुखद दिलासा महावितरणने दिला आहे. परिमंडळातील 38 लाख 71 हजार ग््रााहकांचे गणित मांडले, तर महिन्याला सुमारे 10 कोटी रुपये बचत होणार आहे.

राज्य सरकारने गुरुवारी वीजदर कमी करण्याची घोषणा केली. त्यामुळे वीजग््रााहक खूष झाले. यात घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, कृषी पंपधारक ग््रााहकांना फायदा होणार आहे. महावितरणच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, सौर ऊर्जेचे उत्पादन वाढल्याचा हा परिणाम आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबविली यातून, 4 हजार मेगावॅट वीज दिली जाते. तसेच, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविली.

शेतकरी दिवसा सौरऊर्जेचा वापर सिंचनासाठी करीत आहेत. त्यामुळे या योजनेचा भार इतर ग््रााहकांवर पडत नाही. त्यामुळे विजेचे दर सरकारला कमी करता आले.यामुळे पुणे परिमंडळातील वीजग््रााहकांना चांगलाच फायदा होणार आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे : पुणे परिमंडळात 33 लाख 87 हजार वीजग््रााहक आहेत. त्यांचे प्रतियुनिट कमी झालेले दर पुढीलप्रमाणे (युनिटनुसार दर आहेत. दर रुपये पैशांमध्ये.)

वहन आकारात 13 पैशांनी वाढ

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने राज्यातील वीजग््रााहकांना विजेचे दर कमी करून दिलासा दिला आहे. असे असले तरी वहन चार्जेस (आकार) मध्ये मात्र 13 पैशांनी वाढ केली आहे. ती अशी विजेच्या बिलामध्ये वहन आकार 1 रुपया 47 पैसे आहे. 1 एप्रिलपासून त्यामध्ये वाढ करून ते 1 रुपया 60 पैसे करण्यात आले आहेत. म्हणजेच, वहन आकारात 13 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

वीजदर कमी होण्याची कारणे

  • वीज कंपन्या (महावितरण, टाटा पॉवर, अदानी, ईएड) यांनी दर कमी करण्याचा प्रस्ताव दिला होता. प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केला.

  • वीज कंपन्यांचा खर्च कमी झाला. वीज तयार करण्यासाठी लागणारा खर्च (कोळसा, इंधन, उत्पादन खर्च) काही प्रमाणात कमी झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT