पुणे: अमेरिकेतून विनाशुल्क सोयाबीन तेल आयातीच्या शक्यतेमुळे शेंगदाणा तेलांसह सर्वच खाद्यतेलांच्या दरातही डब्यामागे 50 ते 125 रुपयांपर्यंत घसरण झाली. नव्या हिरव्या वाटाण्याची आवक वाढल्याने दरात क्विंटलमागे आठशे ते एक हजार रुपयांची घट झाली. मात्र, आवक कमी असल्याने सेलम मटकी दरात क्विंटलमागे आणखी एक हजार रुपयांची वाढ झाली. मागणी अभावी गुळाचे दरही क्विंटलमागे दीडशे रुपयांनी उतरल्याचे सांगण्यात आले.
भारत आणि अमेरिकेदरम्यान अलीकडेच झालेल्या व्यापार करारांतर्गत तेथून विना आयातशुल्क सोयाबीन तेलाची आयात होणार असल्याचे समजते. अद्याप याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, यामुळे बाजाराचा नूरच पालटून गेला आहे. लुणार वर्षामुळे पुढील काही दिवस चीनमधील बाजारपेठा बंद राहाणार आहेत. चीन हा खाद्यतेलांचा मोठा आयातदार देश असून या देशाची खरेदी बंद राहाणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय
बाजारात गेल्या आठवडयात सोयाबीन, पामोलिन तसेच सुर्यफूल तेलाच्या दरात मोठया प्रमाणात घसरण झाली आहे. विना आयातशुल्क सोयाबीन तेल आयातीच्या शक्यतेमुळे देशांतर्गत बाजारात आयातदारांकडून विक्रीचा दबाव वाढला आहे. यामुळे स्थानिक बाजारात शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांचे दर 15 किलो / लिटरच्या डब्यामागे 50 ते 100 रुपयांपर्यंत घसरण झाली. सुर्यफूल तेलाच्या दरात डब्यामागे 75 ते 125 रुपयांपर्यंत तर वनस्पती तुपाच्या दरात 100 रुपयांनी घट झाली आहे. या वृत्तामुळे देशांतर्गत बाजारपेठामध्ये सोयाबीनचा प्रतिक्विंटलचा दर 5900 रुपयांवरुन 5200 रुपयांपर्यंत घसरला आहे. आवक जावक साधारण असल्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी तसेच आटा, रवा आणि मैद्याचे दर स्थिर होते.
साखर स्थिर, गुळाचे दर उतरले
साखरेस मागणी चांगली आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने शितपेय आणि आईसक्रिम उत्पादकांकडून साखरेस मागणी वाढत आहे. यामुळे गेल्या आठवडयातही साखरेचे दर टिकून होते. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 4 हजार ते 4 हजार 50 रुपये होता. गुळाची आवक नियमितपणे होत आहे, मात्र उठाव कमी असल्याने गेल्या आठवड्यात सर्व प्रकारच्या गुळाच्या दरात क्विंटलमागे 100 ते 150 रुपयांनी घट झाली. महाशिवरात्रीमुळे भगरीचे दर तेजीत होते तर साबुदाणा स्थिर होता. मात्र तुटवडा कायम असल्याने शेंगदाण्याचे दरही तेजीतच होते.
येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते:
साखर (प्रतिक्विंटल) 4000-4050 रु.खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2700-2800, रिफाइंड तेल 2230-3100, सरकी तेल 2050-2300, सोयाबीन तेल 1970-2230, पामतेल 1900-2100, सूर्यफूल रिफाइंड तेल 2000-2250, खोबरेल तेल 4800, वनस्पती 1800-2270 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसुरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 14000-16000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4050-4250, लोकवन नं. 2 3650-4050, नं.3 3350-3650, सिहोर नं. 1 5700- 6000, सिहोरी 3850-4450, मिलबर 3250-3300 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6200, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3200-3300रु. गूळ :- गूळ एक्ष्ट्रा 4450-4600, गूळ नं. 1 4250-4400, गूळ नं.2 4000-4100 गूळ नं.3 3800-3900, नं. 4 - 3600-3700, बॉक्स 3800-4900 रु.
डाळी: तूरडाळ 10000-12400, हरभराडाळ 6900-7000, मूगडाळ 9500-10000, मसूरडाळ 7200-7300, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12500 रु. कडधान्ये:-हरभरा 6200-6500, हुलगा 4500-5000 चवळी 7000-9500, मसूर 6600-6700, मूग 9000- 9500, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6800-7000, मटकी गुजरात 6800-7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 16000-16500, वाटाणा हिरवा 7000-8000, वाटाणा पांढरा 4600-4700, काबुली चणा 7500-11000 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 5000, साबुदाणा नं.2 4750, साबुदाणा नं.3 4500 रु. वरई भगर :-11000-13000, सावा भगर 10000-11000 रु. गोटा खोबरे 3200-3400 रु. शेंगदाणा :- जाडा 11200-11800, स्पॅनिश13000-14000, घुंगरु 12500 टीजे 11000 रु. धने :- गावरान 11000-12000, इंदूर 13000-15000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पांहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 5500-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1750-1850, रवा 1800-1850, मैदा 1800-1850, बेसन:- (50 किलोस) 4150-4450 रु. मीठ :- मीठ खडे (50किलोस) 300, मीठ दळलेले (50 किलोस) 350 रु. मिरची:-काश्मीरी ढब्बी 5000-60000, ब्याडगी 35000-40000, लवंगी तेजा 21000-22000, गुंटूर 23000-25000, खुडवा गुंटूर 1100-13000, खुडवा ब्याडगी 14000-15000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 2100-2300, मद्रास 4500-5000, पालकोल जुना 2500-2600, सापसोल 4500-5200 रु.