दिगंबर दराडे
पुणे: पुण्याला आर्थिक विकासाच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी केंद्र सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पुण्यात ‘आर्थिक ग््राोथ हब’ उभारणीसाठी तब्बल 5 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुण्याच्या औद्योगिक, तांत्रिक आणि उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला नवा वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले की, नीती आयोग, राज्य सरकार आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (झखउ) यांच्यात या प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार झाला असून, आर्थिक मास्टर प्लॅनचे काम सुरू झाले आहे. विविध हितधारकांशी सल्लामसलत आणि माहिती संकलन अंतिम टप्प्यात असून, लवकरच अंतरिम अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. हा प्रकल्प ‘विकसित भारत ऽ2047’ या राष्ट्रीय संकल्पनेला पूरक ठरणार आहे.
हा ग््राोथ हब 6,914 चौ. कि.मी. क्षेत्रात विकसित केला जाणार असून, त्यामध्ये पुणे जिल्हा, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रे, कॅटोन्मेंट आणि औद्योगिक विकास महामंडळाचा (चखऊउ) समावेश असेल. या उपक्रमासाठी 80 हजार कोटी रुपयांचा दीर्घकालीन मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. पुण्याला तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (अख) क्षेत्रातील जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पानुसार देशभरातील सात शहराधारित आर्थिक ग््राोथ हब्स विकसित करण्यात येणार असून, त्यामध्ये पुण्याचा समावेश आहे. बंगळुरू, सुरत, वाराणसी, विशाखापट्टणम, भुवनेश्वर-पुरी-कटक आणि कोईम्बतूर-इरोड-तिरुपूर या शहरांप्रमाणेच पुण्यालाही पुढील पाच वर्षांत दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
ही घोषणा मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार बी. व्ही. आर. सुबमण्यम यांनी पुण्याला दिलेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. त्या वेळी त्यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुणे महानगर प्रदेशाला उच्च-विकास आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा रोडमॅप मांडला होता. माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल्स आणि अभियांत्रिकी उत्पादन क्षेत्रातील मजबूत पायाभूत क्षमता हीच या महत्त्वाकांक्षी योजनेची खरी ताकद असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
5 हजार कोटी रुपयांची तरतूद
केंद्रीय अर्थसंकल्पात पुण्यामध्ये आर्थिक ग््राोथ हब उभारणीसाठी 5 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे उद्योग, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
6,914 चौ. कि.मी. क्षेत्रात 80 हजार कोटींचा मास्टर प्लॅन
पुणे जिल्हा, महापालिका क्षेत्रे, कॅन्टोन्मेंट आणि चखऊउ भागांचा समावेश असलेला हा ग््राोथ हब सुमारे 6,914 चौकिमी क्षेत्रात विकसित होणार असून, एकूण 80 हजार कोटी रुपयांचा दीर्घकालीन मास्टर प्लॅन तयार केला जात आहे.
जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान व रोजगार केंद्र म्हणून पुण्याचा विकास
‘विकसित भारत ऽ 2047’च्या उद्दिष्टांनुसार पुण्याला खढ, उत्पादन, शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील जागतिक केंद्र बनविण्याचा सरकारचा मानस असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.