Pune Bar Association Election: पुणे बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. काळुराम भुजबळ यांचा दणदणीत विजय

चुरशीच्या लढतीत 597 मतांनी बाजी; उपाध्यक्ष, सचिव, खजिनदारपदांचेही निकाल जाहीर
Pune Bar Association
Pune Bar AssociationPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत ॲड. काळुराम भुजबळ यांनी निर्विवाद वर्चस्व राखत विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेद्वार ॲड. विशाल शिवले यांचा ५९७ मतांनी पराभव केला. ॲड. भुजबळ यांना ३ हजार ८०७ मते मिळाली.

Pune Bar Association
Pune Mumbai Expressway Traffic: पुणे–मुंबई एक्स्प्रेस वे बंद; रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी, एसटीच्या 120 फेऱ्या रद्द

शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयातल अशोका हाॅल येथे बुधवारी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडली. गुरूवारी दुपारी एकपर्यंत मतमोजणीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी झालेल्या तिरंगी लढतीत ॲड. कांताराम नप्ते हे ३ हजार ६१९ मते तर ॲड. प्रतापराव मोरे हे 2 हजार ७०६ मते घेऊन विजयी झाले. महिला राखीव गटातून ॲड. प्रितीसिंह परदेशी यांनी ३ हजार ४७ मते मिळवित विजय संपादन केला.

Pune Bar Association
Mumbai-Pune Expressway Traffic Jam: पुणे–लोणावळा प्रवास ठरला तीन तासांचा; द्रुतगती मार्गाची कोंडी, जुन्या दिवसांची आठवण

सचिव पदी ॲड. सम्राट जांभुळकर आणि ॲड. अभिजीत पोळ हे विजयी झाले. त्यांना अनुक्रमे ४ हजार २७२ आणि ३ हजार ३४४ मते मिळाली. महिला राखीव गटातून ॲड. पूजा पवार यांनी ३ हजार ८७६ मते मिळवित विजय संपादन केला. खजिनदारपदासाठी झालेल्या लढतीत ॲड. अंजली बांदल यांनी निर्विवाद वर्चस्व राखत ५ हजार २७४ मते मिळविली. आॅडीटर पदासाठी झालेल्या लढतीत ॲड.

Pune Bar Association
Sugarcane FRP Maharashtra: ऊस एफआरपी 2025-26 : शेतकऱ्यांचे 4,252 कोटी रुपये अजूनही थकीत

शिवराज निंबाळकर यांना ५ हजार २९० मते मिळाली. तर महिला गटातून ॲड. नेहा जांभळे यांनी ४ हजार ४ मते मिळवित निर्विवाद वर्चस्व राखले. तर, कार्यकारिणी सदस्यपदी सर्वसाधारण गटातून मयुर मराठे, विकास जाधव, उमेश मांजरे, प्रितेश दळवी, योगेश जैन, अनिल हुडे, अमोल वडगणे, उदय शेलार प्रज्वल गुंजाळ आणि आकाश भिलारे यांची निवड झाली आहे. तर, महिला राखीव गटातून संध्या रायबोले, शितल देशमुख, गुंजन भोसले, स्मिता वाघमारे आणि प्रियंका घाडगे यांची यापुर्वीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

Pune Bar Association
Pune Ajit Pawar Condolence Meeting: अजित पवार यांच्या स्मृतींना पुण्यात भावनिक आदरांजली

खजिनदार, आॅडीटरकडून पाच हजारांचा टप्पा पार

बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत यंदा 7 हजार 500 मतदान झाले. यामध्ये, खजिनदार पदाच्या उमेद््वार अंजली बांदल यांना ५ हजार २७४ मते मिळाली. त्यांना तब्बल ३ हजार २३९ मतांचे मताधिक्य राहिले. तर, आॅडीटरपदासाठी झालेल्या लढतीत शिवराज निंबाळकर यांना ५ हजार २९० मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेद्वाराचा तब्बल ३ हजार ४१० मतांनी पराभव केला. बांदल आणि निंबाळकर यांना तीन हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याने न्यायालयात या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news