पुणे: धनकवडी परिसरात एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड चोरी केली. ही घटना 12 ते 14 डिसेंबर दरम्यानच्या कालावधीत घडली आहे.
याबाबत संजय सदाशिव दिघे (वय ५५, रा. राजमुद्रा सोसायटी, ओंकार पार्क इमारत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांकडून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीत राहायला आहेत. १२ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडले व चोरट्यांनी दिघे यांच्या सदनिकेत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटावरील मोकळ्या जागेत दिघे यांनी एका पिशवीत एक लाखांची रोकड ठेवली होती. चोरट्यांनी कपाटावर ठेवलेली पिशवी चोरून नेली. सहायक पोलिस फौजदार बापू खुटवड तपास करत आहेत.