पुणे होणार ‘भारताची सायकल राजधानी’! Pudhari
पुणे

Pune Cycle Capital Project: पुणे होणार ‘भारताची सायकल राजधानी’! महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा निर्धार

75 किमी सायकल मार्ग उभारण्याची महापालिकेची तयारी; पर्यावरणपूरक प्रवास आणि आरोग्यदायी शहराकडे वाटचाल

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणे हे आपल्या समृद्ध सायकल संस्कृतीसाठी ओळखले जाते. आता ही परंपरा पुन्हा उजळवून पुण्याला ‌‘भारताची सायकल राजधानी‌’ बनविण्याची वेळ आली आहे. आमचे उद्दिष्ट संपूर्ण शहरभर सुमारे 75 कि. मी. सायकल मार्गांचे जाळे उभारणे असून ज्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलस्वार सुरक्षितपणे प्रवास करू शकतील, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले.(Latest Pune News)

शनिवारवाडा ते सिंहगड यादरम्यान आयोजित ‌‘हिंदआयन बाइक अँड हाइक‌’ या सायकल मोहिमेच्या समारोपप्रसंगी बोलत होते. या उपक्रमात टेरीटोरियल आर्मी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, भारतीय वायुदल, तसेच पुणे महानगरपालिका सायकल क्लब आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

राम म्हणाले, सायकलिंग हे पर्यावरणपूरक तसेच आरोग्यास उपयुक्त असे वाहतूक साधन आहे. त्यामुळे सायकलस्वारांसाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक आहे. या उद्देशाने महानगरपालिका ‌‘पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर‌’साठी 75 कि.मी. सायकल मार्ग तयार करत आहे. हा उपक्रम जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. या उपक्रमांमुळे पुणे लवकरच देशाची सायकल राजधानी म्हणून ओळखले जाईल, असा आम्हाला विश्वास आहे.

उमाकांत दिग्गीकर म्हणाले, भारतीय टेरीटोरियल आर्मी, वायुदल आणि बीएसएफच्या जवानांसोबत सायकल चालविण्याचा सन्मान लाभला. सिंहगडाच्या माथ्यावर भारतीय सैन्याने पुरविलेला भोजनाचा अनुभव संस्मरणीय होता. पुणे महानगरपालिकेच्या उत्कृष्ट आयोजनामुळे आणि वैद्यकीय सहाय्यामुळे हा प्रवास अत्यंत आनंददायी झाला. आम्ही पुढील हिंदआयन उपक्रमांमध्ये नक्की सहभागी होऊ. हिंदआयन सायकल मोहिमेचे आयोजक विष्णुदास चपके यांनी महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT