Curry Leaves Pudhari
पुणे

Pune Curry Leaves Price Hike: कढीपत्त्याच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले

आवक घटल्याने कढीपत्त्याची जुडी १५ ते २० रुपयांवर; बाजारात ग्राहकांची नाराजी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: फोडणीसाठी आवर्जून वापरल्या जाणाऱ्या कढीपत्त्‌‍याने सध्या गृहिणींचे बजेट बिघडवले आहे. एरवी पाच ते दहा रुपयांना मिळणारी कढीपत्त्‌‍याची जुडी आता 15 ते 20 रुपयांपर्यंत विकली जात आहे. बाजारात कढीपत्त्‌‍याची आवक घटल्याने दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

मार्केट यार्डातील तरकारी विभागात सध्या दररोज सुमारे एक ते दीड हजार किलो कढीपत्ता दाखल होत आहे. बाजारात आवक कमी प्रमाणात होत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईतील बाजारपेठांमध्ये आंध प्रदेशातून कढीपत्ता मागविण्यात येत आहे. महाराष्ट्रात कढीपत्त्‌‍याची लागवड होत असली, तरी लांबलेला पाऊस आणि हवामान बदलाचा फटका पिकाला बसला आहे. परिणामी, स्थानिक उत्पादन घटल्याने बाहेरच्या राज्यांतून कढीपत्ता मागवावा लागत असल्याचे चित्र आहे.

कढीपत्त्‌‍याची आवक खूपच कमी झाली आहे. आधी घाऊक बाजारातून स्वस्तात माल मिळायचा, पण आता दर खूप वाढले आहेत. त्यामुळे आम्हालाही जास्त किमतीत खरेदी करावी लागत आहे. ग््रााहकांना जुडी 15 ते 20 रुपयांना द्यावी लागत असल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. विक्रीवरही त्याचा परिणाम होत आहे. उन्हाळ्यात आवक वाढली तर दर काहीसे कमी होतील, अशी आशा आहे.
चरण वणवे, किरकोळ विक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT