पुणे

पुणे : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात पर्यटकांची गर्दी

अविनाश सुतार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कामगार दिनाची मिळालेली सुट्टी आणि विकेंडचा रविवार यामुळे कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात (Rajiv Gandhi Zoo Pune) पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे.

(Rajiv Gandhi Zoo Pune) प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारापासून मुख्य रस्त्यापर्यंत आणि त्याशेजारी असलेल्या पादचारी मार्गावर पर्यटकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. तिकीट खिडकीवरही सकाळपासूनच पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत. पर्यटकांना प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंह, वाघ, हत्ती, अस्वल यासह सरपटणारे प्राणी, पक्षी, सारंग-सुरंग वर्गातील प्राणी पाहायला मिळत आहेत. तसेच, नव्याने प्राणिसंग्रहालय दाखल झालेले राज्य प्राणी शेकरू, वाघाटी मांजर, रान मांजर देखील पाहायला मिळणार आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT