पुणे

Pune Crime News : कोंढवा पोलिसांनी पकडली 7 पिस्तुले 24 काडतुसे

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने रेकॉर्डवरील सराईत तीन गुन्हेगारांना अटक करून, त्यांच्या ताब्यातून सात पिस्तुले आणि 24 जिवंत काडतुसे असा साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत पिस्तुलाचे मध्यप्रदेश कनेक्शन उघड केले. या कारवाईची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रकरणी संदेश जाधव (वय 32, रा. चिखली, पुणे), शिवाजी ऊर्फ शिवा भाऊ कुडेकर (वय 34, रा. -वाशेरे, तालुका- खेड, पुणे) आणि राहुल नर्सिंग लिंगवाले (वय 24, रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार विशाल मेमाने यांना त्यांच्या खबर्‍याकडून माहिती मिळाली होती की, बोपदेव घाटाच्या पायथ्याला गारवा हॉटेलजवळ दोन व्यक्ती संशयितरित्या पिस्तूल घेऊन फिरत आहेत. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील यांच्या पथकाने त्या ठिकाणी संशयित आरोपींचा शोध घेऊन संदेश जाधव व शिवाजी कुडेकर यांना पाठलाग करून पकडले. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. संरक्षणासाठी विनापरवाना पिस्तूलजवळ बाळगले असल्याचे सांगितले.

संदेश जाधववर यापूर्वीचे 32 गुन्हे

आरोपी संदेश जाधव याच्यावर यापूर्वीचे 32 गुन्हे दाखल असून, त्यात खून,घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न, वाहन चोरीचा समावेश आहे, तर कुडेकर याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. कुडेकर याच्या खेड येथील घराची झडती घेतली असता, पोटमाळ्यावर आणखी तीन पिस्तूल आणि नऊ काडतुसे लपवून ठेवली होती. ती जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT