Assault Crime Pudhari
पुणे

Pune Crime: 'आमच्या मुलीसोबत मैत्री करायची लायकी आहे का?' म्हणत तरुणाला बेदम मारहाण

अमन याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय शेख याला होता.

पुढारी वृत्तसेवा

पुणेः  प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडी भागात घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

अमन सुभाष मोरे (वय २६, सध्या रा. दत्तवाडी, मूळ रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अल्तमश नासीर शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्ात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय शेख याला होता. अमन आणि त्याची मैत्रीण हे २३ फेब्रुवारी रोजी सिंहगडावर फिरायाल निघाले होते. अमनच्या मैत्रिणीचे डोके दुखत असल्याने ते एका ओैषध विक्री दुकानात गेले. डोके दुखीवर त्यांनी गोळ्या घेतल्या. त्यानंतर आरोपी शेख आणि आठ ते दहा साथीदार तेथे आले. 'तू कोठे चालला आहे. आमच्या मुलीसोबत मैत्री करायची. तुझी लायकी आहे का', अशी विचारणा करुन अमनला दुचाकीवरुन भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात नेले.

तेथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये अमनला गजाने बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेतील अमनला महात्मा फुले स्मारक परिसरात सोडून आरोपी शेख आणि साथीदार पसार झाले. जखमी अवस्थेतील अमनने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री उशीरा आरोपी शेख याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT