Pune Cooperative Bank Gold Loan Pudhari
पुणे

Pune Cooperative Bank Gold Loan: बनावट सोन्याच्या तारणावर सुवर्णकर्ज; पुण्यात सहकारी बँकेची कोट्यवधींची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युएटरसह 42 जणांवर गुन्हा

वारजे-माळवाडी व बिबवेवाडी शाखांमध्ये गैरप्रकार उघड

पुढारी वृत्तसेवा

पुणे : वारजे माळवाडी परिसरातील कल्याण जनता सहकारी बँकेच्या शाखेत सुवर्णकर्जाच्या नावाखाली मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. बँकेचा अधिकृत सोने मूल्यनिर्धारक (गोल्ड व्हॅल्युएटर) आणि अनेक कर्जदारांनी संगनमत करून शुद्ध सोन्याऐवजी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेतून लाखो रुपयांचे कर्ज उचलल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी एकूण 42 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

बँकेचे गोल्ड व्हॅल्युएटर अजित कुलकर्णी, कर्ज घेणारे प्रदीप गिरांजे, रंजना प्रदीप गिरांजे, प्रियंका प्रभाकर गिरांजे, सरस्वती गायकवाड, मीनाक्षी गायकवाड, भीमराव गायकवाड, रोहिणी कांगणे, रामभाऊ कांगणे, रोहन मानकर, शुभम राऊत, तेजस राउत, किरण लोंढे, ऋषिकेश मानकर, शुभम धोत्रे, वर्षा लडकत, महेश लडकत, अंकुश पाठक, सोमनाथ आल्हाट, अश्विनी आल्हाट तरे बँकेच्या बिबवेवाडी शाखेतील कर्जदार मनोज चलवादी, महेश चलवादी, निल्लप्पा चलवादी, राजश्री लडकत, अजय करोसीया, जयश्री चलवादी, मधू चलवादी, नागेश चलवादी, मेघना सुपेकर, गौतम सुपेकर, सई थोरात, सौरभ

थोरात, पोर्णिमा तिडके, रूपेश सुर्वे, अर्चिता जागडे, गौरव आढाव, पूनम येलकर, संदीप येलकर, सुनील कदम, पल्लवी कदम, प्रणव खंडारे, वैजंयती कदम अशी त्यांची नावे आहेत. यामध्ये 82 लाख 33 हजारांच्या मुद्दलीसह 34 लाख 22 हजार व्याज अशी एक कोटीहून अधिकची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बँकेचे उप व्यवस्थापक नीलेश देशमुख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सध्या या व्यवहाराची सविस्तर आर्थिक छाननी सुरू असून, तारण ठेवलेले दागिने व संबंधित कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली जात आहे. याच पद्धतीने इतर शाखांमध्येही गैरप्रकार झाला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

तारण ठेवलेले दागिने बनावट

वारजे माळवाडी तसेच बिबवेवाडीतील शाखांमध्ये अनेकांनी दागिने तारण ठेवून सुवर्णकर्ज घेतले होते. बँकेच्या नियमानुसार अधिकृत मूल्यनिर्धारकाने दागिन्यांची तपासणी करून दिले त्यानंतर प्रत्येकास साधारण दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले. दरम्यान, पडताळणीत धक्कादायक बाब समोर आली. तारण ठेवलेले दागिने शुद्ध सोन्याचे नसून बनावट सोने असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बँकेचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. हा प्रकार 2020 ते 2021 या कालावधीत घडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT