पुणे : घाटमाथ्यावर हवेचा दाब अनुकूल असल्याने तेथे जुलैमध्ये चांगला पाऊस झाला, तर ऑगस्टमध्येही मध्यम पाऊस तेथे पडत आहे. त्यामुळे शहरात हलका ते मध्यम पाऊस सुरू असून, यंदाच्या मान्सून हंगामात 251.8 मिमी पावसाची 5 ऑगस्टपर्यंत नोंद झाली. मात्र, अजूनही 113 मिमीची तूट आहे.
यंदा शहरात मान्सून 25 जून रोजी आला तेव्हापासून शहरात 22 मिमीच्यावर मोठा पाऊस एकाच दिवसात पडलेला नाही. मात्र, दररोज रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराची आकडेवारी 250.8 मिमीवर पोहोचली आहे. मात्र, अजून शहराची सरासरी गाठण्यासाठी 113 मिमी.ची तूट आहे. 5 ऑगस्टपर्यंत शहराची सरासरी 365मिमीची आहे. मात्र, वरच्या हवेत वार्याचा वेग फार कमी असल्याने शहरात अजूनही पावसाचा जोर कमीच आहे.
शहरात रिमझिम पाऊस… शनिवारीही शहरात रिमझिम पाऊस झाला. ऊन-पावसाचा खेळ अन् अधूनमधून हलका पाऊस शहराच्या सर्व भागांत झाला. शिवाजीनगर 1, पाषाण 1.3, लोहगाव 0.4, चिंचवड 3.5, तर मगरपट्टा भागात 1.5 मिमी पावसाची नोंद झाली.
हेही वाचा