'चितळे बंधू मिठाईवाले' यांची नवीन शाखा पुण्यातील 'न्यू सांगवी' येथे सुरू करण्यात आली. 
पुणे

Pune News| दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'चितळे बंधू मिठाईवाले' यांची नवीन शाखा पुण्यातील 'न्यू सांगवी' येथे सुरू

दर्जेदार मिठाई आणि बाकरवडी आता सांगवीत उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि मिठाईच्या क्षेत्रात आपल्या दर्जेदार उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नवीन शाखेचा शुभारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी (दि. २०) न्यू सांगवी, पुणे येथे करण्यात आला. या नवीन दालनाचे उद्घाटन श्री. केदार चितळे यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी सौ. सुषमा आर. तनपुरे (नगरसेविका) आणि श्री. संजय (नाना) काटे (नगरसेवक) यांची प्रमुख उपस्थिती होती.

'चितळे बंधू मिठाईवाले' हा महाराष्ट्रातील एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय ब्रँड असून, पारंपरिक चव, दर्जेदार उत्पादने आणि ग्राहकांचा विश्वास ही ब्रँडची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. अनेक वर्षांची समृद्ध परंपरा जपत 'चितळे बंधू मिठाईवाले' सातत्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत. ग्राहकांना दर्जेदार मिठाई आणि खाद्यपदार्थ सहज उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने न्यू सांगवी येथे नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे.

या नवीन शाखेमुळे न्यू सांगवी तसेच परिसरातील नागरिकांना चितळे बंधूंच्या विविध लोकप्रिय मिठाई आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. सण-उत्सव, कौटुंबिक समारंभ आणि आनंदाच्या खास प्रसंगांसाठी चितळे बंधूंची उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.

नव्या शाखेचा पत्ता : शॉप क्रमांक ९, ग्राउंड फ्लोअर, वेस्ट-९, न्यू मिलेनियम स्कूलजवळ, न्यू सांगवी, पुणे – ४११०६१.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT