पुणे : जिल्ह्यात यंदाच्या मे महिन्यातील गत १२ वर्षाच्या पावसाचे विक्रम मोडीत काढले आहेत.शहरात बुधवारी एकाच दिवसांत एनडीए भागात १११ मी.मी पावसाची नोंद झाली. शहरात मे महिन्यातील एकूण पाऊस हा १३२.३ मी.मी वर पोहोचला असून हा गत बारा वर्षातील मे महिन्यातील विक्रमी पाऊस ठरला आहे. यापूर्वी मे २०१५ मध्ये शहरात ११२.७ मी.मी पाऊस पडला होता.
मे महिन्याची सरासरी 11.4 मी.मीची आहे. मात्र हा पाऊस वळवाचा पाऊस म्हणून महिन्याच्या शेवटच्या आढवड्यातच पडलेला आजवर पाहिला आहे. मात्र, यंदाच्या मे महिन्यातील दृष्य खूप वेगळे अन अनेक विक्रम मोडणारे दिसत आहे. कारण, गेल्या तीन दिवसांपासून विक्रमी पाऊस शहरासह जिल्ह्यात बरसतो आहे. आगामी तीन दिवस शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने हा पाऊस गत ५० वर्षातील विक्रम मोडेल, असे चित्र दिसत आहे.
वर्ष - पाऊस
२०१३ - ०
२०१४ - ९.४
२०१५ - ११२.७
२०१६ - ६.५
२०१७ - ७.५
२०१८ - ३.७
२०१९ - ०
२०२० - ३४.८
२०२१ - ८८.८
२०२२ - ०.७
२०२३ - १९.४
२०२४ - ९.२
२०२५ - १३.३ (२२ मे अखेर)