Pune Book Fair 2026 Pudhari
पुणे

Pune Book Fair 2026: पुणे जगाची ‘पुस्तकांची राजधानी’ व्हावे; २४ व्या पुणे बुक फेअरचे उद्घाटन

‘ज्ञानसमृद्ध समाजाची निर्मिती’ संकल्पनेवर पुस्तक जत्रा; मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांतील पुस्तकांचा खजिना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वाचनाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तकांच्या वाचनातून माणूस ज्ञानाने आणि विचारांनी समृद्ध होतो. पुण्यात वाचनाची मोठी परंपरा आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्याने जगाची पुस्तकांची राजधानी म्हणून ओळख निर्माण करावी, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणीस यांनी बुधवारी व्यक्त केले.

टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर 'ज्ञानसमृद्ध समाजाची निर्मिती' या संकल्पनेवर आधारित २४ व्या पुणे बुक फेअर २०२६ अर्थात पुणे पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन फडणीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अशोक पलांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, साहित्यिक रवींद्र गुर्जर, पुणे बुक फेअरचे संयोजक पी. एन. आर. राजन आणि समन्वयक शिरीष चिटणीस उपस्थित होते.

या प्रदर्शनात मराठी, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमधील पुस्तके उपलब्ध आहेत. हे पुस्तक प्रदर्शन रविवारपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. स्वप्निल पोरे यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT