पुणे: मार्केट यार्डातील भुसार बाजारात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून मंदीचे वातावरण कायम आहे. सण-उत्सवांचा हंगाम नसल्याने बाजारात मालाला अपेक्षित उठाव मिळत नसून, त्यामुळे सर्वच प्रकारच्या भुसार वस्तूंचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. पुढील महिना ते दीड महिना हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. श्रावण महिन्यात विविध सण-उत्सव सुरू झाल्यानंतर बाजारातील उलाढाल वाढण्याची अपेक्षा आहे.
संपूर्ण उन्हाळी सुट्टीच्या काळात बाजारात मंदी होती. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ग्राहकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हा अंदाज फोल ठरला असून, अद्याप ग्राहकसंख्येत विशेष वाढ झालेली नाही. पुढील महिन्यात वारीनिमित्त शहरात भाविकांची गर्दी होणार असल्याने त्यावेळीही बाजारातील व्यवहार वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अलीकडील डिझेल दरवाढीचा परिणाम अद्याप कोणत्याही भुसार वस्तूंच्या किमतींवर झालेला नाही. मात्र, वाहतूक खर्च वाढल्यामुळे येत्या काळात त्याचा परिणाम बाजारभावांवर जाणवू शकतो.
साखर (प्रतिक्विंटल) ४२००-४२५० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल २६५०-२९००, रिफाईंड तेल २३००-३१००, सरकी तेल २१५०-२६००, सोयाबीन तेल २१५०-२६००, पामतेल २१५०-२४५०, सूर्यफूल रिफाईंड तेल २३५०-२५००, खोबरेल तेल ४०००, वनस्पती २०५०-२५५० रु. तांदूळ:- गुजरात उकडा ३६५०-४२००, मसुरी ३१००-३५००, सोना मसूरी ४४००-७४००, एच.एम.टी. कोलम ५७००-६०००, लचकारी कोलम ६६००-७१००, चिन्नौर ६५००-७०००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००-११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु. गहू - लोकवन नं. १ ४१५०-४४००, लोकवन नं. २ ३७००-३९००, नं.३ ३०७५-३६५०, सिहोर नं. १ ५९००-६५००, सिहोरी ३८५०-४४५०, मिलबर २९००-२९५० रु. ज्वारी :- गावरान नं. १ ५७००-६५००, गावरान नं.२ ५२००-५५००, नं.३ ४७००-५१००, दूरी नं.१ ३८००-४०००, दूरी नं. २ ३५००-३७०० रु बाजरी:- महिको नं.१ ३४००-३७००, महिको नं.२ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु. गूळ :- गूळ नं. १ ४६००-४७५०, गूळ नं.२ ४४५०-४५५०, गूळ नं.३ ४३००-४४००, बॉक्स ४५००-५५०० रु.
डाळी:- तूरडाळ १००००-१२५००, हरभराडाळ ७३००-७५००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७५००-७६००, मटकीडाळ ८२००-८३००, उडीदडाळ १००००-१२००० रु. कडधान्ये:-हरभरा ७१००-७५००, हुलगा ६६००-७२००, चवळी ७८००-१०२००, मसूर ७५००-८२००, मूग ९२००-१२०००, मटकी गावरान १५०००-१७०००, मटकी पॉलिश ८७००, मटकी गुजरात १६५००-१७५००, मटकी राजस्थान ७५००-८०००, मटकी सेलम १७५००-१८७००, वाटाणा हिरवा ५०००-५५००, वाटाणा पांढरा ४९००-५२००, काबुली चणा ७६००-११००० रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.१ ७०००, साबुदाणा नं.२ ६५००, साबुदाणा नं.३ ६२०० रु. वरई भगर :-२००००-२१०००, सावा भगर १९०००-२०००० रु. गोटा खोबरे ३७०००-३९००० रु. शेंगदाणा :- जाडा ११०००-१२५००, स्पॅनिश–१२३००-१३८००, घुंगरु ११२००-१२७०० धने :- गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७००० इंदुर सुपर २५०००-३०००० रु. पोहे :- मध्य प्रदेश ४६००-४९००,पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४६००-४८००, दगडी पोहा ४८००-५१००, पातळ पोहा ५२००-५८००, सुपर पोहा ५२००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ५५०-६५०, भाजके डाळे ३२००-३८००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५६०, भडंग ८५०-११००, घोटी ५४० रु. रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १६००-१६५०, रवा १६५०-१७५०, मैदा १६५०-१७५०, बेसन:- (५० किलोस) ३९००-४६५० रु.मिरची: काश्मीरी ढब्बी ६००००-६५०००, ब्याडगी ३५०००-५००००, लवंगी तेजा २३०००-२५०००, गुंटूर २४०००-२६०००, खुडवा गुंटूर १२०००-१३०००, खुडवा ब्याडगी १६०००-१८००० रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग १७००-१८५०, मद्रास ४६००-४८००, पालकोल जुना २१००-२३००, सापसोल ३५००-५००० रु.
आवक घटूनही गुळाचे दर स्थिर
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे दौंड, केडगाव आणि सांगली परिसरातील अनेक गुऱ्हाळे बंद झाली आहेत. त्यामुळे दररोज सुमारे ८० टन होणारी गुळाची आवक आता केवळ २० टनांवर आली आहे. आवक घटली असली तरी मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे गुळाचे दर स्थिर आहेत. सध्या शेंगदाणा, साबुदाणा, भगर, सर्व प्रकारच्या डाळी, अन्नधान्य, खाद्यतेल, बेसन, नारळ तसेच इतर भुसार वस्तूंचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.