Fire Pudhari
पुणे

Pune Gas Leak Restaurant: भारती विद्यापीठ परिसरात गॅसगळती; चार कामगार जखमी

उपाहारगृहात भडका उडाल्याने किरकोळ भाजले; अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भारती विद्यापीठ परिसरातील एका उपाहारगृहात गॅसगळती झाल्यानंतर चार कामगार किरकोळ स्वरूपात भाजले. त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. भारती विद्यापीठ परिसरात नादबह्म इडली हे उपाहारगृह आहे. शुक्रवारी (दि.27) सायंकाळी उपाहारगृहात गॅसगळती झाली. भडका उडाल्याने भटारखान्यात काम करणारे चार कामगार भाजले.

या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत नागरिकांनी कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल केले. कामगारांच्या हात आणि पायाला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅसगळती रोखली. गॅसगळती झाल्यानंतर भडका उडाला.

उपाहारगृहातील छताचे नुकसान झाले, तसेच खिडक्यांचा काचा फुटल्या. जवानांनी उपाहारगृहाची पाहणी केली. तेथे व्यावसायिक वापराचे दोन सिलिंडर आढळून आले. गॅसगळती रोखल्यानंतर उपाहारगृहाची पाहणी केली. त्यानंतर धोका नसल्याची खात्री केल्यानंतर जवान तेथून रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT