पुणे

Pune RTO office: आरटीओ कार्यालयात राडा; केशव क्षीरसागर, अजय मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल   

अविनाश सुतार
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे आरटीओत तुंबळ हाणामारी करत, राडा घालणार्‍या टॅक्सी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कार्यालयात तोडफोड, आरडाओरड करत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणे,  सरकारी कार्यालयातील वस्तुंचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune RTO office
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आरटीओ कार्यालयातील सहायक मोटार वाहन कक्षाच्या समोरील कॉन्फरन्स रूममध्ये, समोरील परिसरात केशव क्षीरसागर व त्यांचे  10 ते 12 साथीदार आणि अजय मुंढे व त्यांच्यासोबत असलेले 5 ते 6 साथीदारांनी आपासांत वाद घालून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग केला. तसेच, येथील कॉन्फरन्स रूममधील टेबल पार्टीशनच्या काचेचे नुकसान केले. त्यामुळे केशव क्षीरसागर, अजय मुंढे व त्याच्या साथीदारांवर कलम 160, 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भोसले यांनी दिली. याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत जाधव करत आहेत. Pune RTO office
शुक्रवारी (दि.23) रोजी पुणे आरटीओ कार्यालयातील ओला-उबेरला नवे दर लागू करण्यासंदर्भातील बैठक सायंकाळी 5 च्या सुमारास पार पडली. त्यानंतर आरटीओ अधिकारी येथील रूममधून बाहेर पडले. त्यानंतर उपस्थित संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात आपापसांतच जुंपली. त्यामुळे येथे झालेल्या तुंबळ हाणामारीत कार्यालयातील वस्तुंचे नुकसान झाले. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT