Doctor Molests Patient Pudhari
पुणे

Baramati Crime | बारामतीत खळबळ! डॉक्टरकडून रुग्ण महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Baramati Doctor Molests Patient

बारामती : पोटदुखीवरील उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या रुग्ण महिलेच्या तपासणीवेळी महिला नर्स उपस्थित न ठेवता तपासणीच्या नावाखाली तिच्या शरीराला वारंवार स्पर्श करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न केल्या. या प्रकरणी बारामतीतील डॉ. राधेय खलाटे यांच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील एका महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली. दि. १९ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. फिर्यादीचे पती बाहेरगावी असल्याने तिने दि. २३ रोजी या प्रकरणी फिर्याद दाखल केली. फिर्यादी महिला बारामतीत मुलासह राहते. तिचे पती नोकरीनिमित्त बाहेर असल्याने ते आठवड्यातून एकदा रविवारी घरी येत असतात. दि. १६ रोजी महिलेने खलाटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ट्रिटमेंट घेतली होती. दि. १९ रोजी तिला मासिक पाळीमुळे पोटात असह्य वेदना होवू लागल्या. त्यामुळे तिने फाईलवरील नंबरवर संपर्क साधत दवाखान्यात येत असल्याचे सांगितले.

त्यानंतर ती मुलासह दवाखान्यात पोहोचली. तेथील स्टाफने तिला सलाईन लावले. त्यानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. राधेय खलाटे हे तेथे आले त्यांनी केबिनमध्ये महिलेला बोलावून घेतले. रक्तदाब व ह्दय तपासणी केली. बाकी काही त्रास आहे का अशी विचारणा केली. त्यानंतर डोळे बंद करून स्पाईन एक्सरसाईज करायला सांगत ते तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. ही लगट सहन न झाल्याने फिर्यादी खुर्चीवर जावून बसली. मला एक्सरसाईज करायचे नाहीत, तुम्ही गोळ्या द्या, मला जाऊ द्या, असे म्हणत ती निघून गेली.

त्यानंतर दि. २० रोजी फिर्यादी महिलेच्या व्हॉटसअॅपवर डॉक्टरांकडून दसऱ्याच्या शुभेच्छा असा मेसेज पाठविण्यात आला. त्यावर फिर्यादीने त्यांना डॉक्टर तुम्ही त्या दिवशी माझ्याशी जे वर्तन केले ते चुकीचे होते, असे सांगितले. त्यावर डॉक्टरांकडून आयएम सॉरी, पुन्हा असे होणार नाही, असा मेसेज पाठविण्यात आला. दरम्यान, पती बारामतीत आल्यानंतर फिर्यादीने ही बाब त्यांना सांगत पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT