Baramati Crime : राणा सुर्ववंशी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक!

२३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, रविवारी सांयकाळी पायलट ढाब्याजवळ झाला होता हल्ला
Baramati Crime : राणा सुर्ववंशी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक!
Baramati Crime : राणा सुर्ववंशी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक!
Published on: 
Updated on: 

बारामती : बारामतीतील राणा शिपिंग कंपनीचे मालक व उद्योजक राणा दिलीप सुर्ववंशी यांच्यावर शस्त्राने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पार्थ वासुदेव अवथळे (वय १९, रा. पिंपरी गवरी, ता. खामगाव, जि. बुलडाणा, सध्या रा. कर्वेनगर पुणे ) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, रा. विटा, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. थोरात नगर, भिगवण, ता. इंदापूर ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने दोघांनाही २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग पोलिसांना आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १८) रात्री सव्वा सताच्या सुमारास पायलट ढाब्याजवळ, पालखी महामार्गजवळ राणा सुर्ववंशी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची फिर्याद लक्ष्मीकांत महादेव सुर्ववंशी यांनी दिली होती.

त्यानुसार बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विधी संघर्ष बालक व पार्थ या दोघांना शिंदे याने हा गुन्हा करण्यासाठी दोन लाख रुपये दिले होते असे तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला कोणत्या कारणासाठी हल्ला करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दोन आरोपींना पुणे शहर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांचा ताबा बारामती तालुका पोलीस ठाण्याकडे देण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news