Balgandharva Theatre Pudhari
पुणे

Pune Balgandharva Theatre Redevelopment: बालगंधर्व रंगमंदिराचा आधुनिक पुनर्विकास प्रस्तावित

आयुक्त नवल किशोर राम यांनी तीन आधुनिक प्रेक्षागृहे, रंगमंच व सुधारित सुविधा प्रस्तावित केल्या

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी पुन्हा एकदा पाऊल पडले आहे. महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात बालगंधर्व रंगमंदिराचे आधुनिकीकरण व पुनर्विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित केला असून, अस्तित्वातील इमारत पाडून त्याजागेवर नवीन तीन आधुनिक प्रेक्षागृहे उभारण्याचे नियोजन केले आहे.

पुणे शहरातील ऐतिहासिक व महत्त्वाचे नाट्यगृह म्हणून बालगंधर्व रंगमंदिराची ओळख आहे. हे नाट्यगृह 1968 मध्ये सुरू झाले आहे. याठिकाणी मराठी नाटके, सास्कृतिक कार्यक्रमांबरोबरच राजकिय कार्यक्रमेही होतात. या नाट्यगृहाची इमारती जुनी झाल्याने ती पाडून त्याठिकाणी आधुनिक स्वरूपाची इमारत उभारून वेगवेगळी नाट्यगृह, कलादालन, खुला मंच, पार्किंगची व्यवस्था उभारण्यासाठी 2017 मध्ये तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पुनर्विकासाची योजना मांडली होती. मात्र, या योजनेला नाट्य क्षेत्रातील मंडळींनी विरोध केला. त्यामुळे पुनर्विकासाची योजना बारगळली. आता स्वत: महापालिका प्रशासनानेच बालगंधर्वच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेतला आहे.

आयुक्त नवल किशोर राम यांनी पुढील वर्षांच्या अंदाजपत्रकात पुनर्विकासाचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यानुसार रंगमंदिराची अस्तित्वातील इमारत पाडून त्याठिकाणी 1 हजार 800 आसन व्यवस्था असलेली 3 आधुनिक प्रेक्षागृहे, आधुनिक रंगमंच व ध्वनी-प्रकाश व्यवस्था, कलाकरांसाठी सुधारित मेक-अप रूम व ग््राीन रूम, स्वच्छ व आधुनिक शौचालये, पाणीपुरवठा व्यवस्था, सीसीटीव्ही, प्रेक्षकांसाठी अधिक पार्किंग व्यवस्था व परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे नियोजन केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT