Prostitution Racket Pune Pudhari
पुणे

Pune Spa Prostitution Raid: पुणे विमानतळ परिसरातील स्पा सेंटरवर छापा; पोलिसांनी पाहताच मॅनेजर पीडितेची गॅलरीतून उडी, मृत्यू

अहिल्यानगर रोडवरील सिटी स्पेस बिल्डिंगमध्ये कारवाई; वेश्याव्यवसाय प्रकरणी तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: स्पा सेंटरच्या नावे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर विमानतळ पोलिसांनी छापा टाकला. या वेळी पोलिस आल्याचे पाहून दोघे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून खाली पळून जात होते. त्यामध्ये एक स्पा मॅनेजर, तर दुसरी महिला आहे. स्पा मॅनेजरचा पाय मोडला असून, महिलेचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी मॅनेजरवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितले. हुसेन शेख असे स्पा मॅनेजरचे नाव आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही घटना अहिल्यानगर रोड विमानतळ परिसरातील सिटी स्पेस बिल्डिंग पहिला मजला द रुटस स्पा येथे सोमवारी (दि.23) साडेतीन वाजता घडली आहे. सिटी स्पेस बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर द रुटस स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्या वेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजले.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, महिला अंमलदार, पंचासमक्ष स्पावर कारवाई करण्यासाठी सिटी स्पेस बिल्डिंगमध्ये दाखल झाले. पोलिसांनी स्पाचा दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला; मात्र, कोणी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पोलिसांनी काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तेथे चार पीडित महिला आणि चार पुरुष आढळून आले. त्याच वेळी पोलिसांना एका केबीनचा दरवाजा लावलेला दिसला. त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. परंतु तो दरवाजा देखील कोणी उघडला नाही. त्यामुळे तो दरवाजाही तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला.

त्या वेळी एक महिला त्यांना आढळून आली. त्यांनी तिला विचारले असता, तिने सांगितले, दोघांनी गॅलरीतून खाली उडी मारली. पोलिसांनी जाऊन पाहिले तेव्हा त्यांना दोघे जण खाली पडल्याचे दिसून आले. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष होता. पोलिसांनी तत्काळ धाव घेत दोघांना सरकारी गाडीतून नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

चौकशीत पायाला दुखापत झालेला पुरुष हा स्पा मॅनेजर असल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT