Plane Pudhari
पुणे

Pune Airport Flight Operations Normal: पुणे विमानतळावर विमान वाहतूक पूर्ववत

२४ तासांत १९६ उड्डाणे; ३३ हजारांहून अधिक प्रवाशांची ये-जा

पुढारी डिजिटल टीम

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 24 तासांत प्रवाशांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. इंडिगो एअरलाइन्सच्या तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेला अडथळा दूर झाल्यानंतर पुणे विमानतळावरील विमान वाहतूक आता पूर्णपणे पूर्ववत झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, एकाच दिवसात 196 विमानांची उड्डाणे झाली असून, सुमारे 34 हजारांच्या घरात प्रवाशांनी प्रवास केला आहे

पुणे विमानतळ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दि. 30 जानेवारीला विमानांचे आगमन आणि प्रस्थान अत्यंत सुरक्षित आणि सुनियोजित पद्धतीने पार पडले. इंडिगो बिघाडापूर्वी जशी पुणे विमानतळावरून विमानोड्डाणे आणि प्रवाशांची ये-जा होती, तशीच हालचाल पुन्हा एकदा पुणे विमातळावर दिसत आहे.

एकाच दिवसांत ही नोंद झाल्याने प्रवाशांचा प्रवास पूर्वीप्रमाणे सुरू झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या बिघाडामुळे देशभरातील उड्डाणांवर परिणाम झाला होता, त्याचा फटका देशभरासह पुणे विमानतळालाही बसला होता.

मात्र, विमानतळ प्रशासन आणि एअरलाइन्सच्या तातडीच्या उपाययोजनांमुळे आता परिस्थिती सामान्य झाली. सर्व एअरलाइन्स सध्या त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार धावत असून, प्रवाशांची सुरक्षा आणि वेळेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

आकडेवारीचा टेकऑफ (30 जानेवारी 2026)

  • आगमन - 98 उड्डाणे - 16,135 प्रवासी

  • प्रस्थान - 98 उड्डाणे - 17,034 प्रवासी

  • एकूण हालचाल - 196 उड्डाणे आणि 33,169 प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT