Flight Pudhari
पुणे

Pune Airport Flights Cancelled: युद्धाचा फटका; पुणे विमानतळावरून दुबई-अबुधाबी उड्डाणे बंद, 15 हजार प्रवासी प्रतीक्षेत

अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे हवाई वाहतूक ठप्प; पर्यटन आणि ट्रॅव्हल व्यवसायाला मोठा धक्का

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्या युद्धामुळे आखाती देशांतील हवाई क्षेत्र धोकादायक झाले असून, त्याचा थेट फटका पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला आहे. गेल्या महिनाभरापासून दुबई आणि अबुधाबीसाठीची उड्डाणे रद्द झाली आहेत. गेल्या 28 फेबुवारीपासून बंद झालेल्या या सेवेमुळे 15 हजारांहून अधिक प्रवासी प्रतीक्षेत असून, त्यामुळे पर्यटन व्यवसायालाही ओहोटी लागली आहे.

उन्हाळी सुट्‌‍ट्यांच्या निमित्ताने पुण्यातील शेकडो कुटुंबे पर्यटनासाठी दरवर्षी दुबई आणि अबुधाबीला जात. यंदा मात्र अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे ऐन सीझनमध्ये पर्यटनाला फटका बसला आहे. अनेकांनी आपले सहलीचे बेतच रद्द केल्याचा मोठा फटका ट्रॅव्हल कंपन्यांना बसला आहे.
नीलेश भन्साळी, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स एजन्सीज असोसिएशन (टाप)
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याहून आखाती देशांकडे जाणारी उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. आखाती देशातील एअरस्पेस खुला झाला, तर एखादे उड्डाण होते. मात्र, दुबई-अबुधाबीसाठी पुण्यातून होणारी हवाई वाहतूक जवळजवळ थांबलेलीच आहे. परिस्थिती निवळताच या सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तोवर प्रवाशांनी सहकार्य करावे.
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
युद्धपूर्व काळात विमानतळाहून परदेशी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. त्यामुळे विमानतळापर्यंत जाणारे आणि परदेशातून पुण्यात आलेले ग््रााहक मिळत होते. आता मात्र या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे उत्पन्नावर विपरित परिणाम झाला आहे.
नितीन इंगुळकर, टॅक्सीचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT