पुणे

Pune Airport Cargo transport: पुणे विमानतळावरून वर्षाला ५० हजार टन मालवाहतूक; जागतिक कार्गो हबकडे झपाट्याने वाटचाल

दै. ‌’पुढारी‌’कडून विमानतळावरील कार्गेा विभागाची प्रत्यक्ष पाहणी

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे : पुणे विमानतळावरून दरमहा सरासरी 10 ते 15 मेट्रिक टन आंतरराष्ट्रीय, तर साडेतीन ते साडेचार हजार मेट्रिक टन देशांतर्गत मालवाहतूक होते. वार्षिक विचार करता, आंतरराष्ट्रीय स्तरावर 123 टन आणि देशांतर्गत 40 ते 50 हजार टन अशी एकूण 50 ते 51 हजार टनांच्या घरात मालवाहतूक येथून यशस्वीपणे पार पडते.

पुणे विमानतळ फक्त प्रवाशांच्या सेवेसाठीच नाही, तर जागतिक व्यापार आणि मालवाहतुकीचे (कार्गेा) महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे. दै. ‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधीने पुणे विमानतळावरील कार्गेा विभागाच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करीत विमानतळावरून होणारी मोठी उलाढाल आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

विमानतळाच्या कार्गेा विभागातून प्रामुख्याने ताजी फळे, भाजीपाला, फुले आणि डे-ओल्ड चिक्स (कोबड्यांची पिले) यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यासोबतच टाटा मोटर्स, कॅटरपिलर, कमिन्स, महिंद्रा आणि मर्सडीिज यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे ऑटो पाट्‌‍र्स येथून परदेशात पाठवले जातात. ई-कॉमर्स आणि पोस्ट ऑफिस कार्गेाची सेवाही आता येथे सुरू झाली आहे.

अत्याधुनिक यंत्रणा आणि कडक सुरक्षा

दै.‌‘पुढारी‌’ने केलेल्या पाहणीत इनबाऊ ंड कार्गेा, आऊटबाऊंड कार्गेा, इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट कार्गेा अशा चारही विभागांतील सुसूत्रता दिसून आली. मालाच्या तपासणीसाठी येथे अत्याधुनिक एक्स रे स्कॅनर मशिन्स, कुशल मनुष्यबळ आणि जलद वाहतुकीसाठी ट्रॉली वाहनांची चोख व्यवस्था असल्याचे दिसून आले. कस्टम विभाग आणि सुरक्षा यंत्रणांच्या कडक पहाऱ्यात प्रत्येक पार्सलची तपासणी केली जाते.

विमानतळावरील एकाच दिवसातील मालवाहतूक (दि.18 ते 19 मार्च 2026)

अवघ्या 24 तासांतील आकडेवारी पाहता, पुणे विमानतळावर 106.97 मेट्रिक टन माल आला (इनबाऊंड कार्गेा), तर 90.14 मेट्रिक टन माल बाहेर (आऊटबाऊंड कार्गेा) पाठवण्यात आला. यामध्ये 1,560 किलोग््रॉम आंतरराष्ट्रीय निर्यातीचा समावेश होता.

पुणे विमानतळ कार्गेा क्षमतेचा पूर्ण क्षमतेने वापर करत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रक्रियेत वेग आला आहे. उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी ही व्यवस्था वरदान ठरत आहे. पुण्याच्या वाढत्या विस्तारामुळे कार्गेाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT