ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू; बाह्यवळण मार्गावर वारजे भागात अपघात File Photo
पुणे

Accident News: ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू; बाह्यवळण मार्गावर वारजे भागात अपघात

अपघातात एक जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरधाव टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातात एक जण जखमी झाला. भरधाव टेम्पो चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अफाक अहमद आझाद खान (वय 29) असे गंभीर जखमी होऊन मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अपघातात फरमान अनिस खान (वय 19) जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टेम्पोचालक कमरुद्दीन तजम्मुल खान (वय 29, रा. पिंपरिया, बहारिच, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Latest Pune News)

याबाबत ट्रकचालक शाम श्रीहरी धुमाळ (वय 41, रा. एककुंडी, ता. कागल, जि. कोल्हापूर) याने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून भरधाव वेगाने टेम्पो निघाला होता. वारजे भागातील साने चौकात भरधाव टेम्पो ट्रकवर आदळला. ट्रकच्या मागील बाजूचे नुकसान झाले.

अपघातात ट्रकमधील क्लीनर अफाक खान आणि फरमान खान हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी अवस्थेतील अफाक आणि फरमान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अफाक याचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT