पुणे : पुण्याहून आता अबू धाबीसाठी नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या विमानसेवेद्वारे पहिल्याच दिवशी 173 प्रवाशांनी पुण्यातून अबू धाबीसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. यावरून आगामी काळात या सेवेला आणखी प्रतिसाद मिळणार आहे, असे चित्र दिसत आहे.
पुणे विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला आणखी एक महत्त्वाचा टप्पा वाढला आहे. यापूर्वी पुण्याहून सिंगापूर, दुबई आणि बँकॉक या तीन ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत्या. त्यात आता आणखी एक अबू धाबी ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे. ही सेवा दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी पुण्याहून अबू धाबीकडे रवाना होणार आहे.
या नव्या मार्गामुळे पुण्याच्या नागरिकांसह व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थ्यांना आणि मध्यपूर्वेत कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणेअबूधाबी थेट उड्डाणाची सुरुवात ही शहराच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाची साक्ष देणारी आहे. मध्यपूर्वेशी कनेक्टिव्हिटी वाढल्याने व्यापार, उद्योग, पर्यटन, गुंतवणूक आणि रा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे देशातील विमानतळ विकासाला आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला अभूतपूर्व गती मिळाली आहे.