पुणे

पुणे : कसबा पोट निवडणुकीआधीच भाजपला धक्का! माजी स्थायी समिती अध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा विधानसभा निवडणुक प्रक्रिया सुरू असतानाच पुण्यात भाजपला धक्का बसला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशिद शेख यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने कसब्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

रशिद शेख यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पुणे केंटोमेन्टची जागा काँग्रेसला थोडक्यात जागा गमवावी लागली होती. आता शेख यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड आदींच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला.

शेख यांचे बंधू हे रफिक शेख हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत, त्यांच्या लोहियानगर-कासेवाडी या प्रभागातील तब्बल 20 हजाराहून अधिक मतदार हे कसबा मतदारसंघात येतात. त्यामुळे शेख यांच्‍या 'घरवापसी'चा फटका कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT