News :
वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या घरी नवी मुंबईतील ट्रक हेल्परच्या अहरणाच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस पोहचले असता त्यांच्या अंगावर कुत्री सोडल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान, पूजा खेडकर यांच्या घरी दोन जेवणाचे डबे आले होते. त्यामुळं पोलीसांना घरामध्ये पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा यांच्यासाठी हे जेवणाचे डबे आले होते का असा संशय व्यक्त झाला.
दरम्यान, पूजा खेडकरच्या घरी संशयास्पदरित्या जेवणाचे डबे दाखल झाल्यावर चतु:श्रुंगी पोलीस चौकशीसाठी पोहचले. मात्र यावेळी, पूजा खेडकरच्या आईने मनोरमा यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर घरातील कुत्रे सोडल्याची घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी एक नवा कारनामा केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं पूजा खेडकरचे आई-वडील पुन्हा एका नव्या वादात अडण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत अपघातानंतर एका ट्रक हेल्परचं अपहरण झालं होतं. ही घटना शनिवारी सायंकाळी झाली होती.
एका कारमधून या हेल्परचं अपहरण झालं होतं. अपहण झालेली ही व्यक्ती नंतर पूजा खेडकर हिच्या वडिलांच्या घराजवळ आढळून आली होती. त्यामुळं या प्रकरणाशी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांचा काही संबंध आहे का असा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान, पोलीस देखील अपहरणकर्त्यांच्या गाडीचा माग काढत पुण्यात पोहचले होते. या अपहरणकर्त्यांनी थेट दिलीप खेडकर यांच्या घराजवळ गाडी उभी केली होती. त्यामुळं पोलिसांनी खेडकरांच्या घरात जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरातील कुत्रे त्यांच्या अंगावर सोडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याचदरम्यान, दिलीप खेडकर हे घराच्या मागच्या दरवाज्यातून पसार झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी आता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.