Electric shock death: कारखेल येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन लाकडाच्या दांड्याने त्यांना तारांपासून दूर केले. त्यानंतर बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
Electric shock death
कारखेल येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यूPudhari
Published on
Updated on

सुपे: कारखेल (ता. बारामती) येथे शेळ्या चारताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अल्केश जगनाथ लोंढे (वय 40) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. कारखेल हद्दीतील लोंढेवस्ती शेजारील गट क्रमांक 204 मधील शेतात लोंढे शेळ्या चारत होते.

त्यांचा रिमझिम पावसात विजेच्या खांबाजवळील विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार धक्का बसला आणि ते जागीच कोसळले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन लाकडाच्या दांड्याने त्यांना तारांपासून दूर केले. त्यानंतर बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (Latest Pune News)

Electric shock death
Leopard Terror: राजेवाडीत सलग तीन दिवस बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

जळगाव कडेपठार येथील महावितरण शाखा कार्यालयाचे शाखा अभियंता कांताराम भंडलकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. या वेळी ते म्हणाले, वीज प्रवाह सुरू असताना झाडे तोडल्यामुळे एक झाड तारांवर पडले. त्यामुळे बंद असलेल्या तारांमध्ये विद्युत पुरवठा उतरला असावा. हा अपघात त्यातून घडला असावा असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

Electric shock death
Purandar PMRDA: पुरंदर तालुका येणार ‌’पीएमआरडीए‌’च्या अखत्यारीत; आ. विजय शिवतारे यांची माहिती

सुपेचे पोलिस उपनिरीक्षक जिनेश कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याचे कोळी यांनी सांगितले. या घटनेनंतर कारखेल परिसरात शोककळा पसरली असून लोंढे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news