पुणे: पुढारी वृत्तसेवा दै. 'पुढारी' आयोजित पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन यांच्या सहकार्याने महिलांच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त पुणेकर क्रीडाप्रेमी, स्पर्धक, पालक ज्या स्पर्धेची वाट पाहत होते, त्या 'पुढारी राईज अप' पुणे महिला बॅडमिंटन स्पर्धेच्या चौथ्या हंगामाचा शुभारंभ उद्या सकाळी १० वाजता होणार आहे.
ही स्पर्धा शनिवारी दि. ३१ जानेवारी व रविवारी दि. १ फेब्रुवारी या दोन दिवशी सकाळी १० पासून शिवाजीनगर येथील पौडीएमबीएच्या कोर्टवर होणार आहे. या स्पर्धेत नऊ वर्षांखालील, अकरा वर्षांखालील, तेरा वर्षाखालील, पंधरा वर्षांखालील, सतरा वर्षांखालील, एकोणीस वर्षांखालील आणि खुला गट, असे सात गट सहभागी होणार आहेत. मुलींच्या एकेरी आणि दुहेरी, तर महिलांच्या खुल्या गटातील एकेरी आणि दुहेरी गटात या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेत प्रवेश विनामूल्य असून, विजेत्यांना रोख पारितोषिके, मेडल्स आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेला मुख्य प्रायोजकत्व माणिकचंद ऑक्सिरिच यांचे असून, फायनान्स पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, अॅकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट यांचे आहेत. सहप्रायोजक म्हणून अदानी तर असोसिएट्स स्पॉन्सर म्हणून व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज, केजेईआय ट्रिनिटी, अमानोरा पार्क टाऊन यांचे सहकार्य मिळाले आहे. या स्पर्धेसाठी पुणे शहराबरोबरच पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड येथून मोठ्या प्रमाणावर महिला स्पर्धकांनी जास्तीत सहभाग नोंदविला आहे, तरी बॅडमिंटनप्रेमी पुणेकरांनी या स्पर्धेसाठी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन दै. 'पुढारी'तर्फे करण्यात आले आहे.