पुणे: दै. ‘पुढारी’च्या वतीने आणि पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित महिलांच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे. ‘पुढारी राईज अप’ पुणे महिला स्पर्धेचा चौथा हंगाम यावर्षी होत आहे.
शनिवारी सकाळी 10 वाजता शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या कोर्टवर व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष बांदल, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे मार्केटिंगप्रमुख आदित्य भेंडे, ‘लागू बंधू’चे संचालक सारंग लागू यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेत 9, 11, 13, 15, 17 आणि 19 वर्षांखालील व खुला गट, अशा सात गटांतून तब्बल 300 हून अधिक मुली व महिला स्पर्धक सहभागी झाले आहेत. मुलींच्या एकेरी आणि दुहेरी, तर महिलांच्या खुल्या गटातील एकेरी आणि दुहेरी गटात या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेत प्रवेश विनामूल्य असून, विजेत्यांना रोख पारितोषिके, मेडल्स, प्रमाणपत्रे व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरिच यांचे असून, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, ॲकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट हे आहेत. सहप्रायोजक म्हणून अदानी, तर असोसिएट पार्टनर व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ट्रिनिटी, अमनोरा पार्क टाऊन, सपोर्टिंग पार्टनर पुणे महापालिका यांचे सहकार्य मिळाले आहे.दै. ‘पुढारी’ आयोजित राईज अप महिलांच्या कुस्ती स्पर्धेला खेळाडूंनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेत अनेक गुणवंत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम दै. ‘पुढारी’सारख्या माध्यमाने केले आहे. त्यांच्या या उपक्रमात आमच्या लोकमान्य संस्थेला खारीचा वाटा उचलण्याची संधी दिल्याने दै. ‘पुढारी’चे विशेष आभारी असून, आगामी काळातही असे सहकार्य आमच्याकडून राहील.
महिलांसाठी स्पर्धा घेण्यासाठी दै. ‘पुढारी’सारखे माध्यम पुढे आले आहे. मुलींना मोठे व्यासपीठ मिळून दिले आहे. या स्पर्धेत मुलींबरोबर त्यांच्या पालकांचाही उत्साह मोठा आहे. दै. ‘पुढारी’सारखे माध्यम महिला खेळाडूंसाठी पुढाकार घेत असेल, तर उद्योजकांनी अशा खेळाडूंना वाव मिळवून द्यावा. दै. ‘पुढारी’ने अशा प्रकारच्या महिलांसाठीच्या स्पर्धांचा उपक्रम पुढेही सातत्याने सुरू ठेवावा.संतोष बांदल (व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष, व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज)
दै. ‘पुढारी’ आयोजित राईज अप महिलांच्या कुस्ती स्पर्धेला खेळाडूंनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेत अनेक गुणवंत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम दै. ‘पुढारी’सारख्या माध्यमाने केले आहे. त्यांच्या या उपक्रमात आमच्या लोकमान्य संस्थेला खारीचा वाटा उचलण्याची संधी दिल्याने दै. ‘पुढारी’चे विशेष आभारी असून, आगामी काळातही असे सहकार्य आमच्याकडून राहील.आदित्य भेंडे (मार्केटिंगप्रमुख, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी)
दै. ‘पुढारी’च्या वतीने केवळ महिलांसाठी या स्पर्धा भरवून महिलांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. एखाद्या माध्यमाने क्रीडा क्षेत्रात पुढाकार घेणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. दै. ‘पुढारी’ने अशा उपक्रमात नेहमीच अग््रेासर राहावे.सारंग लागू (संचालक, लागू बंधू)