Pudhari Mahamisal Festival-5 Pudhari
पुणे

Pudhari Mahamisal Festival: ‘पुढारी महामिसळ महोत्सव-5’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

झणझणीत मिसळ, गाण्यांची मैफल आणि भारत-न्यूझीलंड सामन्याचा थरार; खवय्यांची नाहटा लॉन्सवर गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: टी-20 वर्ल्डकपचा भारत-न्यूझीलंडमधील क्रिकेट सामना पाहण्यासह मिसळचा आनंद घेणारी तरुणाई... आपल्या ग््रुापसह झणझणीत अन्‌‍ तर्रीबाज मिसळवर ताव मारणाऱ्या महिला... सोबतीला रंगलेली बहारदार गीतांची मैफल अन्‌‍ पोटभर मिसळ, थंड टेस्टी कुल्फी आणि ताकाचा घोट घेतल्यानंतर खवय्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान... असे उत्साही वातावरण रविवारी (दि. 8) माणिकचंद ऑक्सिरीच प्रायोजित ‌‘दै. पुढारी महामिसळ महोत्सव - सीझन 5‌’मध्ये पाहायला मिळाले.

सुटीचा दिवस असल्याने वेगवेगळ्या चवीच्या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली अन्‌‍ कुटुंबीयांसह क्रिकेट सामना पाहत चवदार मिसळवर ताव मारला. पुणे असो वा ठाणे... अशा विविध ठिकाणच्या झणझणीत अन्‌‍ चविष्ट मिसळबरोबरच चहा-कॉफीचा आनंद देखील मिसळप्रेमींनी घेतला. महिला असो वा ज्येष्ठ नागरिक... तरुण असो वा लहान मुले... सर्वच वयोगटांतील खवय्यांनी मोठ्या संख्येने महोत्सवाला भेट दिली. रंगपंचमी, जागतिक महिला दिन, टी-20 वर्ल्डकपची फायनल आणि दै. पुढारी मिसळ महोत्सवाचे निमित्त... यामुळे रविवारचा दिवस पुणेकरांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

मिसळ महोत्सवाच्या चार यशस्वी सीझननंतर यंदाच्या पाचव्या सीझनलाही पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर पुलाजवळील नाहटा लॉन्स येथे आयोजित महोत्सवाला शनिवारी (दि. 7) खवय्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रविवारी देखील (दि. 8) त्यापेक्षाही अधिक खवय्यांनी महोत्सवाला भेट देत मिसळचा पुरेपर आस्वाद घेतला. सायंकाळी पाच वाजल्यानंतर तर मिसळ महोत्सवाचे ठिकाण गर्दीने फुलून गेले. आपल्या आवडीची मिसळ, ताक, चहा-कॉफीचा घोट, भारत-न्यूझीलंडमध्ये रंगलेला क्रिकेट सामना मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचे निमित्त, लहान मुलांनी घेतलेला आईस्क्रीमचा आनंद, कलाकारांनी सादर केलेली सदाबहार हिंदी-मराठी गाणी तसेच विविध स्टॉलवर खरेदीचे निमित्त... असे वातावरण पाहायला मिळाले. राव मिसळ, मामलेदार मिसळ, सूर्या मिसळ, खानदेशी मिसळ, दुर्वे मिसळ, शारदानंद मिसळ, सुरती मिसळ, एस. आर. मिसळ, नादखुळा मिसळ, महाजन मिसळ, स्वाद मिसळ आणि दोस्ती मिसळ या नामांकित मिसळचा आस्वाद मिसळप्रेमींना घेता आला. काळ्या रश्याची, तर लाल रश्याची मिसळ... त्यात शेव-फरसाण असे समीकरण खवय्यांच्या पसंतीस उतरले. चीज मिसळ, मिसळ पाणीपुरी, वऱ्हाडी मिसळ अशा विविध प्रकारच्या मिसळ खवय्यांना खूप आवडल्या. एकाच ठिकाणी पुणेकरांना वेगवेगळ्या चवीच्या, झणझणीत आणि तर्रीबाज मिसळवर ताव मारता आला. काही मिसळ स्टॉलवर तर अक्षरश: रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रविवारी सकाळपासून महोत्सवात गर्दी व्हायला सुरुवात झाली. सायंकाळनंतर तर वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या खवय्यांची नाहटा लॉन्समध्ये गर्दी झाली. गरमागरम मिसळचा आस्वाद घेत अनेक जण गप्पांमध्ये रमले. खवय्यांनी मिसळ स्टॉलला भेट देत त्याचे प्रकार आणि त्याबाबतची वैशिष्ट्‌‍ये, याबद्दलची माहिती जाणून घेतली. सकाळी आठ वाजता सुरू झालेला हा महोत्सव रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होता. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनीही मोठ्या प्रमाणात महोत्सवाला भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.

एकूणच सुटीच्या दिवशी

दै. ‌‘पुढारी‌’ आयोजित या महोत्सवाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रंगपंचमीचा सण असूनही रंग खेळून पेटपूजा करण्यासाठी मिसळ महोत्सव खवय्यांसाठी पर्वणी ठरले. महोत्सवासाठी माणिकचंद ऑक्सिरीच हे मुख्य प्रायोजक तसेच लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी (फायनान्स पार्टनर), सूर्यदत्ता ग््रुाप ऑफ इन्स्टिट्यूट (एज्युकेशन पार्टनर), हॅन्ग्यो (आईस्क्रीम पार्टनर) आणि कात्रज दूध डेअरी (डेअरी पार्टनर) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पुणेकरांना घेता आला बहारदार गाण्यांच्या मैफलीचा आनंद

‌‘दै. पुढारी महामिसळ महोत्सवा‌’त खवय्यांना फक्त खाद्यपदार्थांचाच नव्हे, तर गाण्यांच्या मैफलीचाही आनंद घेता आला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी ‌‘गीतो की श्याम आपके नाम‌’ ही गाण्यांची मैफल रंगली. गायिका तेजस्विनी पाहुजा, गायक नितीन गायकवाड आणि अजय निकम यांनी बहारदार गीते सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. सुरेल गीतांच्या या मैफलीने महोत्सवाचा रंगत आणली. कलाकारांच्या सूरमयी सादरीकरणाने वातावरण अधिक सुरेल झाले.

रील्स अन्‌‍ सेल्फीचीही धूम

‌‘दै. पुढारी महामिसळ महोत्सवा‌’त रविवारी सेल्फी अन्‌‍ रील्सची धूम पाहायला मिळाली. विविध झणझणीत मिसळचे व्हिडीओ आणि रील्स बनवत अनेकांनी ते इन्स्टाग््राामवर अपलोड केले, तर काहींनी कुटुंबीयांसोबत मिसळचा आस्वाद घेतानाची क्षणचित्रे मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. तर, महिला-युवतींच्या ग््रुापने सेल्फी क्लिक केले. तरुणाईच्या ग््रुापने रील्स बनवत इन्स्टाग््रााम आणि फेसबुक शेअर करीत त्याखाली महामिसळ महोत्सवाबद्दल खास संदेश लिहीत उपक्रमाचे कौतुकही केले. सोशल मीडियावरही महोत्सवाची चर्चा असल्याचे पाहायला मिळाले.

टी-20 क्रिकेट पाहण्याचे निमित्त...

रविवारी टी-20 वर्ल्डकपच्या भारत-न्यूझीलंडमध्ये रंगलेल्या अंतिम सामन्याचा आनंद पुणेकरांना मोठ्या स्क्रीनवर घेता आला. महोत्सवाच्या ठिकाणी दै. ‌‘पुढारी‌’च्या वतीने स्क्रीनवर सामना दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिसळवर ताव मारत पुणेकरांनी सायंकाळी सामना पाहण्याचा आनंद लुटला. भारतीय संघाला चिअरअप करीत अनेकांनी क्रिकेटपटूंनी चौकार-षटकार मारताच टाळ्यांचा कडकडाट केला. क्रिकेट सामना पाहण्याचे निमित्त त्यांच्यासाठी खास ठरले.

विविधप्रकारच्या मिसळ एकाच ठिकाणी उपलब्ध

भाग्यश्री पिंपळे, रेवती दिनकर, प्रणीता दिनकर, उज्ज्वला शिंदे, शिल्पा बह्मे, अर्चना कांबळे, विजया माने, वैजयंता पाडाळकर, माधुरी पिंपळे या धायरीवरून मिसळचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या. या महिलांच्या ग््रुापने महोत्सवातील वेगवेगळ्या चवीच्या मिसळवर ताव मारला आणि मिसळचे कौतुकही केले. दै. ‌‘पुढारी‌’ने एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या मिसळ पुणेकरांसाठी उपलब्ध करून दिल्याचा आनंद आहे. आम्हीही मिसळचा आस्वाद घेतला आणि प्रत्येक मिसळची चव वेगळी होती. दै. ‌‘पुढारी‌’च्या या उपक्रमाचे कौतुक आहे, अशा शब्दांत या ग््रुापने महोत्सवाबद्दल प्रतिक्रिया दिली.

सहकुटुंब घेतला मिसळचा आस्वाद

सिंहगड रस्ता येथून आलेले स्वागत व्होरा, ऋतुजा व्होरा, निकिता व्होरा आणि अभिषेक व्होरा हे कुटुंबीय मिसळचा आनंद घेण्यासाठी महोत्सवाला आले होते. आम्ही तीन ते चार मिसळचा आस्वाद घेतला, प्रत्येक मिसळची चव आणि वैशिष्ट्‌‍य वेगळे होते. मिसळप्रेमींसाठी दै. ‌‘पुढारी‌’ने हा उपक्रम आयोजित केला, हे खूप महत्त्वाचे आहे. कारण, येथे राज्यभरातील मिसळचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येणे खवय्यांसाठी शक्य झाले. खूपच छान वाटले, अशी महोत्सवाबद्दल प्रतिक्रिया त्यांनी दिली.

क्रिकेट सामन्याबरोबर मिसळचा आनंद

हर्ष ओसवाल, खुशी हिरण, किवा हिरण, साक्षी ओसवाल, दिया गुंदेचा, वरुण जैन, सुमीत जैन, साहिल जैन आणि मासूम जैन या तरुणाईच्या ग््रुापने क्रिकेट सामन्याचा आनंद घेत मिसळचाही आनंद घेतला. प्रत्येक मिसळची चव वेगळी होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मिसळवर ताव मारण्याचे एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले.

पुणेकर ग््रााहकांची मिसळ ही नेहमीच आवडती राहिली आहे. त्यादृष्टीने दै. ‌‘पुढारी‌’ परिवाराकडून ‌‘महामिसळ महोत्सव सीझन 5‌’ आयोजित करून ग््रााहकांना एकाच छताखाली वेगवेगळ्या ठिकाणच्या चविष्ट व दर्जेदार मिसळ खाण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध करून दिली आहे. दै. ‌‘पुढारी‌’चा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य म्हणावा लागेल. अनेक ग््रााहक सहकुटुंब येऊन मिसळचा आस्वाद घेताना दिसत आहेत, हेच या उपक्रमाचे यश आहे, असे मला वाटते.
मनोज लिमये , व्यवस्थापकीय संचालक, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी)
आम्ही येवलेवाडीवरून मिसळचा आस्वाद घेण्यासाठी आलो होतो. राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात मिळणाऱ्या मिसळची चव वेगवेगळी असते. त्यामुळे एकाच ठिकाणी राज्यभरातील व्यावसायिकांच्या झणझणीत आणि तर्रीबाज मिसळवर आम्हाला ताव मारता आला. ही संधी दै. ‌‘पुढारी‌’ने उपलब्ध करून दिल्याचा आनंद आहे. असेच चांगले उपक्रम दै. ‌‘पुढारी‌’ने पुणेकरांसाठी आयोजित करावेत.
भारती सामलेटी आणि ललिता येमूल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT