पुणे

अभिमानास्पद ! राज्यात पुणे महापालिकाच ‘नंबर वन’; आरोग्य विभागाची रँकिंग जाहीर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे महापालिकांच्या आरोग्य कार्यक्रमांचे रँकिंग करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य कार्यक्रमांमधील महत्त्वाचे निर्देशांक तपासण्यात येत आहेत. यामध्ये पुणे महापालिकेने ३८.२१ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

राज्यातील पहिल्या पाच क्रमांकांमध्ये पुण्यासह कोल्हापूर (३७.४३), सांगली (३६.०९), नागपूर (३३.५०), नवी मुंबई (३३.११) या शहरांनी कामगिरी केली आहे. तर, वसई-विरार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि जळगाव या पाच महापालिका शेवटच्या पाच क्रमांकांवर आहेत. पुणे महापालिकेने माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, क्षयरोग दुरीकरण या कार्यक्रमांमध्ये समाधानकारक कामगिरी केल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT