पुणे

अभिमानास्पद ! कमांड हॉस्पिटल बनले श्रवण प्रत्यारोपण करणारे पहिले रुग्णालय

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कमांड हॉस्पिटलने अत्याधुनिक शस्त्रक्रिया करून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पीझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट (बीसीआय) या प्रकारचे श्रवण प्रत्यारोपण करणारे कमांड हॉस्पिटल हे भारतातील पहिले शासकीय रुग्णालय ठरले आहे. मेजर जनरल बी. नांबियार यांच्या नेतृत्वाखाली कान, नाक, घसा विभागाचे विभागप्रमुख कर्नल डॉ. नितू सिंग, न्यूरोटोलॉजिस्ट आणि इम्प्लांट सर्जन कर्नल डॉ. राहुल कुरकुरे यांनी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. दोन्ही कानांनी जन्मजात बहिरेपणा असलेल्या 7 वर्षांच्या मुलावर कमांड हॉस्पिटलमधील कान, नाक आणि घसा विभागाने अत्याधुनिक उपचार पध्दतीचा वापर करून श्रवण प्रत्यारोपण पार पडले.

अत्याधुनिक वैद्यकीय शस्त्रक्रियेबाबत सशस्त्र दल वैद्यकीय सेवा दलाचे डीजी व लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग आणि डीजीएमएस (लष्कर) लेफ्टनंट जनरल अरिंदम चॅटर्जी यांनी कमांड हॉस्पिटलचे अभिनंदन केले आहे. कमांड हॉस्पिटलला सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून नुकतेच रक्षामंत्री ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. कमांड हॉस्पिटलच्या कान, नाक, घसा विभागामध्ये अनेक वर्षांपासून श्रवण प्रत्यारोपण केले जाते. यामध्ये क्वाक्लिअर इंप्लांटचा समावेश होतो. मात्र, यंदा प्रथमच पीझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हियरिंग इम्प्लांट बसवण्यात आले. श्रवणक्षम रुग्णांसाठी प्रत्यारोपण करण्यायोग्य वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. त्याचे प्रत्यारोपण केल्यावर कानाजवळ हाडामध्ये मायक्रोफोन आणि कानाच्या आतमध्ये त्याचा रिसिव्हर असतो. त्यामुळे रुग्णांची श्रवण क्षमता उच्च दर्जाची होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT