बारामती: पुढारी वृत्तसेवा : बारामतीत यापूर्वी कार्यरत असणाऱ्या आणि सध्या पुणे मुख्यालयात कार्यरत असलेल्या दशरथ नामदेव कोळेकर (वय ४०, रा. एमआयडीसी, बारामती) या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने पुण्यात फिर्याद दिली. ती बारामती शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग झाली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, बारामती शहरातील अशोकनगर भागात ही तरुणी राहत होती. कोळेकर यांनी तिला केलेल्या मदतीच्या मोबदल्यात तिच्याशी इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. तिला मारहाण केली. तिच्या परिस्थितीचा फायदा घेत जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.
या त्रासाला कंटाळून ही तरुणी बारामतीतून पुणे येथे निघून गेली असता कोळेकर याने तिच्या बहिणीला फोन व मेसेज करत आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बारामतीत यापूर्वीही अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता ही दुसरी घटना आहे. दरम्यान कोळेकर याच्याविरुद्ध दाखल गुन्हा आंबेगाव पठार येथून बारामती शहर पोलिस ठाण्यात वर्ग झाला आहे. तपास सुरु असून अद्याप या प्रकरणी कोळेकर याला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.