पुणे

राज्यात गोवर हद्दपारीची तयारी; डिसेंबरपर्यंत सर्वांचे लसीकरण

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गोवर-रुबेला आजाराचे डिसेंबर 2024 पर्यंत निर्मूलन करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. राज्याने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे निर्मूलनासाठी कंबर कसली आहे. राज्याने 'कॅच अप' मोहिमेंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या 7377 बालकांना एमआर लसीचा पहिला, तर 5574 बालकांना दुसरा डोस देण्यात आला. कोरोना काळात गोवर रुबेला लसीकरणावर परिणाम झाला. कोरोना महामारीदरम्यान 2020-21 मध्ये फक्त 67 टक्के मुलांना गोवर-रुबेला लसीकरणाचा दुसरा डोस मिळाला आणि 2021-22 मध्ये फक्त 65 % मुलांना दुसरा डोस मिळाला.

म्हणजेच. 30 टक्क्यांहून अधिक बालकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नव्हता. याचाच परिणाम म्हणून मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी नोव्हेंबर 2022 मध्ये लहान मुलांमध्ये गोवरचा उद्रेक पाहायला मिळाला. गोवरच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. बाळांना गोवर आणि रुबेला लसीचा पहिला डोस 9 ते 12 महिन्यांचे असताना. तर दुसरा डोस 16-24 महिन्यांचे असताना दिला जातो. वंचित बालकांसाठी गेल्या तीन महिन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 'कॅच अप' मोहीम राबविण्यात आली. त्यातून लसीकरणाचे 87 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT