पुणे

शौर्यदिन कार्यक्रमाची तयारी करा ; प्रांताधिकारी स्नेहा देवकाते यांचे निर्देश

अमृता चौगुले

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणारा शौर्यदिन एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने कामाला लागून योग्य ती तयारी सुरू करावी व शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेत व सुयोग्य नियोजनात पार पडेल, यासाठी कामाला लागावे, असे पुणे-शिरूरच्या प्रांताधिकारी स्नेहा देवकाते यांनी सांगितले. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे 1 जानेवारी शौर्यदिन कार्यक्रमाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रांताधिकारी स्नेहा देवकाते बोलत होत्या. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दि. 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीनंतर प्रशासनाने योग्य खबरदारी घेतलेली असून, प्रत्येक वर्षी प्रशासनाकडून या कार्यक्रमाची विशेष तयारी करण्यात येते. यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.

या वेळी शिरूर विभागाचे परिविक्षाधीन प्रांताधिकारी हरिश सुळ, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, विस्तार अधिकारी रामेश्वर राठोड, पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रणजीत दाइंगडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, बाळनाथ पवणे, बापूसाहेब गोरे, सरपंच रमेश गडदे, तलाठी सुशीला गायकवाड, अश्विनी कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलिस पाटील मालन गव्हाणे, जयसिंग भंडारे आदी उपस्थित होते.

दरम्यान, प्रांताधिकारी देवकाते यांनी सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत कोरेगाव भीमा ते शिक्रापूर
येथील ठिकठिकाणी होणार्‍या पार्किंग ठिकाणांची पाहणी केली. आरोग्य व महसूल विभागाच्या कामांची माहिती घेत प्रत्येक विभागाला त्यांच्या कामाचे आदेश दिले. पार्किंगच्या ठिकाणी विविध उपाययोजना करण्याचे आदेशही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT