पुणे: पुण्यात वास्तव्यास असलेल्या एका तरुणीने सोशल मीडियावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी पोस्ट शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. सकल हिंदू समाजाने ही माहिती एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करत याप्रकरणी कारवाईची मागणी केली. या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली असून, कोंढवा पोलिस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युद्धजन्य परिस्थितीत समाज माध्यमात पाकिस्तान झिंदाबाद असा मजकूर प्रसारित करणाऱ्या खतीजा शहाबुद्दीन शेख (वय १९, रा. इशा लाॅरियल, कौसरबाग, कोंढवा) हिस कोंढवा पोलिसांनी अटक केली. शनिवारी (दि. १०) तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सकल हिंदू समाजाच्या मते, पुण्यात शिक्षण घेणारी ही तरुणी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहित होती. तिने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा लिहिल्याचा दावा करण्यात आला आहे. (Latest Pune News)
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले. मात्र, या प्रकरणाने सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले असून, अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक पाटणकर यांनी सांगितले की, ’या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.